Nashik News : पिंगळवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Death News
Death Newsesakal

Nashik News : पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील केदा पुंडलिक भामरे (वय ४८) या शेतकऱ्याने उद्ध्वस्त झालेले कांदा पीक आणि कर्जबाजारीपणामुळे आपल्या द्राक्ष बागेत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Suicide of farmer in Pingalwade Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Pune Crime : पुण्यातील धक्कादायक प्रकार! हॉर्न वाजवल्याने तरूणाकडून कारचालकाला मारहाण

पिंगळवाडे येथील कांदा व द्राक्ष उत्पादक केदा भामरे यांचे तीन एकर क्षेत्र आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात पिकविलेले कांदा पीक नेस्तनाबूत झाले होते. त्यातच शिल्लक कांदा बाजार समितीमध्ये कवडीमोल भावाने विकला गेला.

त्यामुळे कांद्याचा खर्च देखील भरून न निघाल्याने भामरे यांचे मोठे नुकसान झाले. कांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून हाती काहीच मिळाले नाही. त्यातच आयडीबीआय बँकेचे मागील वर्षाचे कर्ज सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी घरातील पत्नीचे दागिने गहाण ठेवत कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडणे सुरू ठेवले.

मात्र कोणत्याही पिकाला भाव नसल्याने पत्नीचे दागिने कसे सोडवावे आणि भविष्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, या विवंचनेत त्यांनी काल (ता.२२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आपल्या द्राक्ष बागेत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Death News
Cyber Crime : ऑनलाइन विमानाचे तिकीट काढणे भोवले; गुगलवर नंबर सर्च केल्यावर खात्यातून रक्कम गायब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com