
बहिणीशी चॅटिंगची कुरापत काढत मारहाण; दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
सोग्रस (जि. नाशिक) : आपल्या बहिणीशी मोबाईलवरून चॅटींग (Chatting) केल्याच्या वादातून मारहाण करीत जीवे मारण्याच्या धमकीला घाबरून दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरूवारी (ता. २८) चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे घडली. याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (suicide of tenth grade student Nashik Suicide News)
याबाबत माहिती अशी की, तळेगाव रोहि येथील शुभम राजाराम वाकचौरे (वय १७) यास बहिणीशी चॅटिंग का करतो, अशी कुरापत काढत संशयितांनी मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे शुभमने घाबरून गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप वडिल राजाराम विश्वनाथ वाकचौरे यांनी फिर्यादीत केला. त्यावरून दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: नाशिक : नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला साई धरणात बुडाला
फिर्यादीत म्हटले आहे की दोन ते तीन दिवसांपासून गावातील एकाने दुसऱ्याला सिमकार्ड (Simcard) देऊन स्वतःच्या बहिणीच्या नावाने व्हाट्सअप (Whatsapp), इंस्टाग्राम (Instagram) ग्रुपवर शुभमने खोटे चॅटिंग केल्याची कुरापत काढून संशयित मंगळवारी (ता. २६) रात्री साडेआठच्या सुमारास घरी येत शुभमला मारहाण केली. मुलीच्या वडिलांनीही शुभमच्या कुटुंबियांना धमकी दिली. रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा दहा मुलांनी शुभम व कुटुंबियांना मारहाण केली. त्यानंतर २७ एप्रिलला शुभमला व्हाट्सअपवरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शुभमने घाबरून गुरुवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा: नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात मद्य पार्टी
याप्रकरणी पोलिसांनी विजय बाळासाहेब भोकनळ, योगेश रमेश वाकचौरे, गणेश बाळू सोनवणे, अक्षय जेऊघाले (सर्व रा. निमगाव वाकडा, ता. निफाड), गोकुळ बबन भोकनळ, बाळासाहेब रामदास भोकनळ, आकाश भोकनळ, अमोल युवराज भोकनळ (सर्व रा. तळेगाव रोही) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Web Title: Suicide Of Tenth Grade Student By Hanging Himself Nashik Suicide News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..