नाशिक : नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला साई धरणात बुडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boy drowned in the dam in nashik district

नाशिक : नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला साई धरणात बुडाला

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. (Boy drowned in the dam in nashik district)

शुक्रवारी (ता. २९) दुपारी करंजवण येथील साई संदीप मोरे (वय १६) करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला होता. मोठ्या पाण्यात गेल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीच तासांनी बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे. जेव्हा साई धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरला तेव्हा आजूबाजूला अनेक ठिकाणाचे युवक पोहण्यासाठी आले होते. त्यामुळे साई पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले नाही. मात्र, काही वेळाने हे लक्षात आले. तोपर्यंत उशीर झाला होता. साईने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. या घटनेमुळे करंजवणसह आजूबाजूच्या गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikdamdeath