मालेगाव- केंद्र शासनाने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क हटविल्यानंतर उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्र शासनाचा निर्णय होऊन दोन दिवस उलटले. मात्र भाव जैसे थे आहेत. अंतिम टप्प्यातील लाल कांदा बाजारात येत आहे. तर उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कांद्याला सर्वोच्च १३३० ते १४८६ रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळाला असला तरी सरासरी बाजारभाव हजार रुपयाच्या आसपास आहे.