पाच दिवसात उन्हाळ कांद्याचे भाव ६०० ने घसरले; जाणून घ्या सध्याची स्थिती

summer onion rates collapsed nashik marathi news
summer onion rates collapsed nashik marathi news

नाशिक : आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाने कांद्याचे नुकसान झाल्याने नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याचे भाव ७०० ते ८०० रुपयांवरुन १९ आॅगस्टला क्विंटलला १ हजार ७०० ते १ हजार ९०० रुपयांपर्यंत पोचले होते. पण दक्षिणेत पावसाने उघडीप दिल्याने गेल्या पाच दिवसांमध्ये क्विंटलला ६०० रुपयांनी भाव घसरले आहेत. स्थानिक बाजारपेठेतील भावातील घसरणीमुळे निर्यातीचा भाव टनाला ३२० डॉलरवरुन २७० ते २८० डॉलर झाला आहे. 

कर्नाटकमधील कांद्याला पसंती

चीनचा कांदा जागतिक बाजारपेठेत टनाला २५० डॉलर भावाने पोचला आहे. तसेच पाकिस्तानचा कांदा २७० ते २८० डॉलर टन या भावाने विकला जात आहे. मध्यंतरी उन्हाळ कांद्याचे भाव वाढल्याने मागील आठवड्यात त्याचा परिणाम निर्यातीवर झाल्याचे दिसून आले आहे. सिंगापूर, मलेशिया, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, हाँगकाँगला आठवड्याला सर्वसाधारणपणे २०० कंटेनर होणारी निर्यात ३० कंटेनरपर्यंत कमी झाल्याचे निर्यातदारांनी सांगितले. दरम्यान, दक्षिणेतील पावसाच्या उघडिपीमुळे निर्यातदार आंध्रप्रदेश, कर्नाटकमधील कांद्याला पसंती देऊ लागले आहेत. स्वाभाविकपणे उन्हाळ कांद्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या अखेरीस घसरण होण्यास सुरवात झाली होती. अशातच, बाजार समित्या कर्मचाऱयांचा लाक्षणिक संप, गणरायाचे आगमन, रविवार असे तीन दिवस काही बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहिले होते. 


कांद्याच्या भावाची स्थिती 
(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
बाजारपेठ सोमवारी (ता. २४) गुरुवारी (ता. २०) बुधवार (ता. १९) 
येवला १ हजार १५० १ हजार ३५० १ हजार ८५० 
नाशिक १ हजार १५० १ हजार ५५० १ हजार ३५० 
लासलगाव १ हजार २०० १ हजार ४८० १ हजार ६७० 
मुंगसे १ हजार १ हजार ४५० १ हजार ५५० 
मनमाड १ हजार २५० - १ हजार ६७५ 
सटाणा १ हजार ३२५ १ हजार ५६५ १ हजार ९१० 
पिंपळगाव १ हजार ४०० १ हजार ४५१ १ हजार ७०१ 
देवळा १ हजार २५० १ हजार ४७५ १ हजार ९०० 
उमराणे १ हजार १०० १ हजार ३०० १ हजार ७०० 
नामपूर १ हजार २५० - १ हजार ८५० 

संपादन- रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com