Summer Temperature : मालेगावचा पारा वाढला तापमान 40.6 अंशावर

Rising Temperature
Rising Temperatureesakal

Summer Temperature : शहर व परिसरात पंधरा दिवसानंतर प्रथमच पारा ४० अंशावर गेला आहे. सोमवारी (ता. ८) तापमान ४०.६ अंशावर पोचले. बेमोसमी पाऊस व ऊन-सावलीच्या खेळामुळे यावर्षी अजूनही उन्हाची तीव्रता जाणवत नाही.

दिवसभर कडक ऊन व सायंकाळी ढगाळ वातावरण होते. पावसाने विश्रांती घेतल्याने व्यासायिकांसह लग्न सोहळे असलेल्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. (Summer temperature of Malegaon rises to 40 above degree nashik news)

शहर व परिसरात दरवर्षी मार्च ते मे या महिन्याच्या कालावधीत पारा ४० ते ४५ अंशादरम्यान राहतो. यावर्षी हवा तसा उन्हाचा तडाखा बसला नाही. आतापर्यंत चार ते पाच दिवस पारा ४० अंशावर गेला. बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमान ३२ ते ३७ अंशांदरम्यान राहिले.

सोमवारी प्रथमच कडक ऊन पडले. उन्हामुळे रसवंतीगृह, शीतपेये, मसाले ताक, आइस्क्रीम, कुल्फी, बर्फगोळे आदी विक्रेत्यांच्या दुकानांवर बऱ्यापैकी गर्दी होती. यावर्षी हंगामी व्यवसाय पुरेशा उन्हाअभावी फुललेच नाहीत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Rising Temperature
Summer Holiday : चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा; उन्हाळी सुट्यांसाठी तब्बल 942 स्पेशल गाड्या

शहरासह कसमादेत मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर लग्नसोहळे होत आहेत. २ ते ५ मे या कालावधीत झालेल्या विवाह सोहळ्यातील वऱ्हाडींचे पावसामुळे हाल झाले. दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

बेमोसमी पावसाबरोबर वादळी वारे वहात असल्याने ग्रामीण भागात तसेच शेतमळ्यांमध्ये विवाह सोहळ्यांना अडचणी येत आहेत.

Rising Temperature
Sukene Bypoll Election: सुकेणे सरपंचपदाची पोटनिवडणूक रद्द! अनुसुचित जाती प्रवर्गातील एकाही महिलेचा अर्ज नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com