नाशिक : पशूपक्षांनाही उन्हाळा असह्य; तहान भागवण्यासाठी वणवण भटकंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबासन : मोसम नदीपात्रातील डबक्यातून तहान भागवताना मेंढरे

पशूपक्षांनाही उन्हाळा असह्य; तहान भागवण्यासाठी वणवण भटकंती

अंबासन (जि. नाशिक) : परिसरात उन्हाचे चटके दिवसागणिक वाढतच असल्याने विहिरी, कुपनलिकेतील पाण्याची पातळीही खोलखोल जाऊ लागली आहे. यामुळे बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या अवकळा दिसून येत आहेत. तर तांत्रिक अडचणीमुळे काही गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पशु- पक्ष्यांनाही उन्हाळा असह्य होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच पशु- पक्ष्यांची तृषार्त भागविण्यासाठी भटकंती सुरू होत असते. कुठे शेतात पाणी मिळेल तर काही ठिकाणी साचलेल्या डबक्यातून तहान भागवावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मोसम व काटवन परिसरात उन्हाच्या तीव्र लाटेमुळे दुपारनंतर शेत परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईच्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, कधी वीजेचा लपंडाव तर कधी पाईपलाईन बिघाड अशा एक ना अनेक समस्यांमुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: Dhule | कापडणे शिवारात उन्हाळ्यातही बहरली तीळ

तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत प्रशासनाकडून एकाहून अधिक गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतीच्या विहिरींनी तळ गाठल्याने दोन ते तीन दिवसांआड गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची तीव्रता जसजसे वाढत आहे. विहिरीतील पाणीही तळ गाठत आहेत. नागरिकांप्रमाणेच पशु- पक्ष्यांचीही उन्हामुळे लाहीलाही होत असून, पाण्यासाठी दाही दिशा फिरत आहेत. दरम्यान, वनजंगलातील वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ गावकुसाबाहेर शेतकऱ्यांना निदर्शनास येत आहेत.

हेही वाचा: उन्हामुळे टायर उद्योगाला सुगीचे दिवस; रिमोल्ड टायरकडे वाढतोय कल

"गेल्या अनेक वर्षांपासून गावाला पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे. प्रशासनाकडून कुठलेही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. प्रलंबित हरणबारी उजवा कालव्याचे काम झाल्यास लाभक्षेत्रातील गावांना दिलासादायक ठरेल."
-दीपक ठोके, ग्रामपंचायत सदस्य, सुराणे

Web Title: Summer Unbearable For Animals And Birds Wandering To Quench Thirst In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiksummeranimalbirds
go to top