Sunita Dhangar Bribe Case : लाचखोर धनगर यांची कारागृहात रवानगी; अपसंपदेचाही गुन्हा दाखल होण्याची शक्यता

sunita dhangar Sent to Nashik Road Central Jail nashik bribe crime news
sunita dhangar Sent to Nashik Road Central Jail nashik bribe crime newsesakal

Sunita Dhangar Bribe Case : बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर व कनिष्ठ लिपिक नितीन जोशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

श्रीमती धनगर यांच्याकडून मोठी माया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केल्याने तोच चर्चेचा विषय ठरला आहे. (sunita dhangar Sent to Nashik Road Central Jail nashik bribe crime news)

शुक्रवारी (ता. २) नाशिक रोड परिसरातील एका शिक्षण संस्थेने बडतर्फ केलेल्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून श्रीमती धनगर व जोशी या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. मंगळवारी (ता.६) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने श्रीमती धनगर व जोशी या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

त्याचवेळी न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे दोघांची रवानगी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, चौकशीअंती अपसंपदेचाही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

सदरील गुन्ह्यात तपास ‘लाचलुचपत’च्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sunita dhangar Sent to Nashik Road Central Jail nashik bribe crime news
Sunita Dhangar Bribe Case: लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर मालामाल; घरझडतीत हाती लागलं मोठं घबाड

मॅडमची व्यवस्था करणारा ‘तो’ कोण?

श्रीमती धनगर यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांना मध्यवर्ती कारागृहात नेण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणण्यात आले.

एरवी सिव्हिलमध्ये संशयितांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर लगेच पोलिस वाहनातून कारागृहात नेले जाते. परंतु श्रीमती धनगर यांच्यासाठी कैदी पार्टीचे कर्मचारी अत्यंत संथगतीने व आपलेपणाने वागताना दिसले.

जरा वेळाने एका लाल रंगाच्या दुचाकीवरून पोलिस कर्मचारी त्याठिकाणी आला आणि त्याने ‘मॅडमची सर्व व्यवस्था केलेली आहे’ असे म्हणत त्याने श्रीमती धनगर यांच्याशी काही कानगोष्टही केल्या. त्याचवेळी कैदी पार्टीतील महिला कर्मचारीने त्यास टोमणेही दिले. त्यामुळे मॅडमची व्यवस्था करणार तो पोलिस कर्मचारी कोण? अशीच चर्चा घटनास्थळी रंगली होती.

sunita dhangar Sent to Nashik Road Central Jail nashik bribe crime news
Sunita Dhangar News : नियमांवर बोट ठेवून महापालिकेत वसुली; सायंकाळी सहानंतर चर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com