Super 110 Exam : जिल्ह्यातील 16 परीक्षा केंद्रांवर उद्या ‘सुपर 110’ परीक्षा

 Exam
Exam sakal

Super 110 Exam : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्‍या ‘सुपर ११०’ च्या निवड परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी (ता. १६) जिल्ह्यातील १६ परीक्षा केंद्रांवर सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत परीक्षा होणार आहे. (Super 110 exam tomorrow at 16 exam centers in district nashik news)

आतापर्यंत चार हजार ९६९ विद्यार्थ्यांची निवड परीक्षेसाठी नोंदणी झाली असून, यात एक हजार ९६६ मुले, तर तीन हजार तीन मुलींचा समावेश आहे.

जिल्हाभरातून सुपर ११० ची नोंदणी वाढावी, यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत दोनवेळा वाढविण्यात आली होती. यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यासाठी परीक्षेच्या दिवशीच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर ७० टक्के किंवा ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असल्याचे मार्कशीट तसेच आधारकार्ड दाखविल्यास त्यांना परीक्षेस बसण्यास परवागनी दिली जाणार आहे. निवड प्रक्रियेच्या वेळी या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Exam
Video : अजित पवारांनी घेतला 'वंदे भारत'चा फील; नाशिकमध्ये करणार शक्तिप्रदर्शन

जिल्ह्यात १६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. यात लो. पं. ध. पा. मराठा इंग्लिश स्कूल, सटाणा (बागलाण), नेमिनाथ जैन विद्यालय (चांदवड), श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल (देवळा), जनता इंग्लिश स्कूल (दिंडोरी), जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, घोटी (इगतपुरी), आरकेएम विद्यालय (कळवण), केबीएच महाविद्यालय, मालेगाव कॅम्प व आरबीएच कन्या विद्यालय (मालेगाव), न्यू इंग्लिश स्कूल (नांदगाव), डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल (नाशिक शहर), वैनतेय विद्यालय (निफाड), विजय बिडकर विद्यालय (पेठ), लो. शं. बा. वाजे विद्यालय (सिन्नर), नूतन विद्यालय (सुरगाणा), नूतन त्र्यंबक विद्यालय (त्र्यंबकेश्वर), स्वामी मुक्तानंद विद्यालय (येवला) या केंद्राचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचा आसन क्रमांक हा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर व प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचबरोबर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी लिंक ओपन केलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ‘सुपर- ११०’ चा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती मित्तल यांनी केले. गतवर्षी सुपर ५० साठी ५० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. मात्र यंदा विद्यार्थ्यांची संख्या बघता हा आकडा वाढवून ‘सुपर ११०’ करण्यात आला आहे.

 Exam
Nashik Rain Alert : जिल्ह्यात आज हलका ते मध्यम अथवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com