Student NASA Visit
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेच्या ‘सुपर ५०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून निवड झालेल्या पाच विद्यार्थ्यांनी ‘नाशिक ते नासा’ असा प्रेरणादायी प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देत जागतिक दर्जाच्या विज्ञान, तंत्रज्ञान व अंतराळ संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.