Water Scarcity : उन्हाळा टिपेला; राज्यात 398 गावे अन् 910 वाड्यांना टंचाई

Nashik Water Scarcity: उन्हाळा टिपेला पोचलेला असताना राज्यात गेल्या वर्षीपेक्षा ९६ टँकर कमी धावताहेत.
Nashik Water scarcity
Nashik Water scarcityesakal

Nashik News : उन्हाळा टिपेला पोचलेला असताना राज्यात गेल्या वर्षीपेक्षा ९६ टँकर कमी धावताहेत. सद्यःस्थितीत राज्यातील ३९८ गावे आणि ९१० वाड्यांसाठी ३०५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. (Supply of drinking water through 305 tankers to 398 villages and 910 wadis in state nashik news)

गेल्या वर्षी मेच्या तिसऱ्या आठवड्यात ४५५ गावे आणि एक हजार ८१ वाड्यांसाठी ४०१ टँकर सुरू होते. गेल्या आठवड्यात राज्यातील ३०७ गावे आणि ७०१ वाड्यांसाठी २३० टँकर सुरू होते.

सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत यंदा अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.

गेल्या वर्षी याच कालावधीत नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत प्रत्येकी एक, सांगलीत आठ, औरंगाबाद- एक, बीड- तीन, परभणी- एक, नांदेडला दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत सर्वाधिक १२२ टँकरद्वारे ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतील १९७ गावे आणि ५३६ वाड्यांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे.

त्याखालोखाल नाशिक, जळगाव, नगर जिल्ह्यातील ९५ गावे आणि १३४ वाड्यांसाठी ८२, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील ५५ गावे व २३५ वाड्यांसाठी ४५, तर अमरावती, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांतील २८ गावांसाठी ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Water scarcity
Nashik News: महामार्गावरील CCTVचा नाशिककरांना फायदा! कसारा ते नाशिक मार्गावर कॅमेरे बसविण्याची मागणी

जालना, हिंगोली जिल्ह्यांतील २३ गावे व पाच वाड्यांसाठी २६ टँकर धावताहेत. मॉन्सूनच्या आगमनाला उशीर होण्याचा अंदाज या पूर्वीच वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे वळवाचा पाऊस न झाल्यास ऐन पावसाळ्याच्या जूनमध्ये टँकर सुरू ठेवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमी जलसाठा उपलब्ध

राज्यातील मोठ्या १३८, मध्यम २५९ आणि लघु दोन हजार ५९४ अशा एकूण दोन हजार ९९१ धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा आता जलसाठा कमी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात ३१.७२ टक्के साठा उपलब्ध होता. सद्यःस्थितीत ३०.८२ टक्के साठा शिल्लक आहे.

विभागनिहाय धरणांची संख्या आणि सध्याच्या साठ्याची टक्केवारी अनुक्रमे अशी असून (कंसात गेल्या वर्षीच्या जलसाठ्याची टक्केवारी दर्शवते) : अमरावती- २६१-४०.८१ (३७.५२), औरंगाबाद- ९२०-३४.३४ (३२.२१), कोकण- १७२-३५.३४ (४०.९८), नागपूर- ३८३-४०.२८ (२९.७२), नाशिक- ५३५-३३.१७ (२६.६०), पुणे-७२०-२१.९५ (२३.२८).

Nashik Water scarcity
NMC News : सव्वा किलोमीटरच्या मार्गात 250 अतिक्रमणे; अतिक्रमण कारवाई लूटूपूटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com