esakal | बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला! खरेदीसाठी इगतपुरी, घोटीत गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshotsav-2021

बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला! खरेदीसाठी इगतपुरी, घोटीत गर्दी

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : समस्त भाविकांचे आराध्यदैवत तथा लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून घराघरात उद्या शुक्रवारी (ता.१०) भक्तिभावाने श्रीगणेशाची स्थापना होणार आहे. लॉकडाऊननंतर दोन वर्सांत प्रथमच उत्सवाला परवानगी मिळाल्याने शहरासह तालुक्यातील बाजारपेठांना यात्रेचे स्वरूप आले होते. बाप्पांच्या स्वागतासाठी अवघी तरुणाई सज्ज झाली असून बालगोपाळांची कॉलनीपुरत्या उत्सवासाठी आज लगीनघाई पहायला मिळाली.

गणपतीची आरास करण्यासाठी हव्या असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी इगतपुरी, घोटी, टाकेद, गोंदे व आदी भागात नागरिकांची आज गर्दी झाली. शहराच्या विविध भागात भक्तीचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला. गावात सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी ओसंडून वाहत होती. झेंडू व इतर फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. उत्सवासाठी खरेदीचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. सजावटीच्या विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे.

हेही वाचा: नाशिक : महापालिकेने नाकारली 348 गणेश मंडळांची परवानगी

किंमती स्थिरमुळे दिलासा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच घरोघरी मूर्तीभोवती व समोर आकर्षक सजावटीवर भर असतो. आकर्षक रेडिमेड मखर, झालर, पडदे, लायटिंगच्या माळा, कारंजे यासह मूर्तीसाठी फेटा, मुकुट, आसन खड्यांचा वापर करून तयार केलेले हार अशा विविध सजावटीसह पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सजावट साहित्याच्या किमती काहीअंशी स्थिर असल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: नाशिक : जुळ्या चिमुकल्यांसह खाणीत आढळला बेपत्ता पित्याचा मृतदेह

loading image
go to top