esakal | बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! यातील एक सैन्यदलातून
sakal

बोलून बातमी शोधा

fake money racket

बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा सुरगाणा पोलिसांकडून पर्दाफाश!

sakal_logo
By
रतन चौधरी

सुरगाणा (जि.नाशिक) : उंबरठाण परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक करून सुरगाणा पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, या चौघांपैकी एकजण हा सैन्यदलातील नोकरी सोडून आलेला आहे. काय घडले नेमके?

सुरगाणा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश! येवला, चांदवड, विंचूर भागातून अटक

गुजरात राज्यातील वापी, धरमपूर या भागातील बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणत पोलिसांनी मांधा, बोरचोंड, गुही या भागातील संशयितांना अटक केली होती. उंबरठाण येथे सोमवारी (ता. ६) हरीश वाल्मीक गुजर (वय २९, रा. विंचूर रोड, येवला), बाबासाहेब भास्कर सैद (वय ३८, रा. चिचोंडी खुर्द) व अक्षय उदयसिंग रजपूत (वय ३२, रा. येवला) या तिघांनी एका भाजीविक्रेत्या महिलेला शंभर रुपयाची बनावट नोट देण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेने ही नोट बनावट असल्याचे ओळखले. त्यामुळे तेथील नागरिकांनी या तिघांनाही चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. त्यांची कसून चौकशी केली असता, अक्षय रजपूत याने अन्य चार साथीदारांची नावे सांगितली. तसेच, या नोटा कुठे व कशा तयार होतात, याचा मुख्य सूत्रधार कोण याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलिसांनी संशयित प्रकाश रमेश पिंपळे (वय ३१, रा. येवला), राहुल चिंतामण बडोदे (वय २७, रा. चांदवड), आनंदा दौलत कुंभार्डे (वय ३५, रा. चांदवड), किरण बाळकृष्ण गिरमे (वय ४५, रा. विंचूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून ५०० व १०० रुपयांच्या सहा लाख १८ हजार २०० रुपये किमतीच्या बनावट नोटा व तीन लाख ६० हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, मोबाईल, झेरॉक्स मशिन, चारचाकी वाहन असा एकूण नऊ लाख ७८ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चौघांपैकी प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे यांची सोमवारी (ता. १३) मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तर, आनंदा कुंभार्डे व किरण गिरमे या दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: नाशिक : गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर

सैन्यदलातील नोकरी सोडून आलेला

दरम्यान, आनंदा कुंभार्डे हा सैन्यदलातील नोकरी सोडून आलेला आहे. तर किरण गिरमे याचा साधारण वीस वर्षांपासून विंचूर येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू असल्याचे समजते. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर सहारे, हेमंत भालेराव, पराग गोतुर्णे, गंगाधर ढुमसे, हेमंत भालेराव, संतोष गवळी तपास करत आहेत.

हेही वाचा: दराअभावी मिरची ‘तिखट’! शेतकऱ्याने उपटून टाकले दीड एकर पिक

loading image
go to top