Nepal Currency Notes : चीनला मागे टाकून नाशिक प्रेसला नेपाळच्या नोटा छपाईचे काम!

Nepal Currency Note
Nepal Currency Noteesakal

नाशिक : नाशिक रोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयाला नेपाळच्या एक हजाराच्या ४३० दशलक्ष नोटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. चीन सारख्या बलाढ्य देशाच्या स्पर्धेत प्रेसने हे काम मिळविल्याने या घटनेला महत्व आहे. (Surpassing China Nashik will Press to print Nepal Currency Notes nashik news)

यापूर्वी ५० रुपयाच्या ३०० दशलक्ष नोटा छापण्याचे वेगळे कंत्राटही मिळाले आहे. त्यामुळे आता एकूण ७३० दशलक्ष नोटा छापण्याचा करार नेपाळबरोबर झाल्याची माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

केंद्र सरकारने डिजिटल रुपयाला प्रायोगिक तत्वावर सुरुवात केल्याने बॅँकिंग आणि नोट प्रेस क्षेत्रातील रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना, इतर छोट्या देशांच्या नोटा आणि सिक्युरिटी फिचर्सचे उत्पादन संधी बघण्याची विनंती संघाने प्रेस व्यवस्थापनाला केली होती.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Nepal Currency Note
Code of Conduct End : ZPत कामांची लगीनघाई; 52 दिवसांत 190 कोटी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

त्याला व्यवस्थापनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि नेपाळच्या नोटा छापण्याचे मोठे कंत्राट मिळाल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले.

पासपोर्ट, मुद्रांक, धनादेश, लिकर सील छापणा-या आयएसपी तसेच नोटा छापणा-या सीएनपी प्रेसच्या मशिनरीचे आधुनिकीकरनाची मागणी मजदूर संघाने केली होती. नेपाळच्या नोटांबरोबरच भारताच्या एकूण ५३०० दशलक्ष नोटा छपण्याचे मोठे कामही प्रेसला मिळाल्याने या सर्व नोटा एक वर्षात छापून द्यायच्या असून कामगार त्यासाठी सज्ज झाले आहेत.

Nepal Currency Note
MahaDBT Scholarship | महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ काढायचे निकाली : सुंदरसिंग वसावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com