Rahul Gandhi : राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा 'तो' संशयित पोलिसांच्या ताब्यात; नाशिक पोलिस म्हणाले...

Rahul Gandhi News : काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेदरम्यान मध्यप्रदेशमध्ये गोळ्या घालून अथवा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन नाशिक शहर पोलिसांना आला होता.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

Rahul Gandhi Marathi News : काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेदरम्यान मध्यप्रदेशमध्ये गोळ्या घालून अथवा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन नाशिक शहर पोलिसांना आला होता. याची गांभीर्यांने दखल घेत पोलिसांनी शहरातून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, तो मद्यपी आणि मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे.

मात्र यामुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे समजते. तसेच, गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच कडेकोट सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Rahul Gandhi
Sharad Pawar: बारामती शरद पवारांचीच! भाषणाला उभे राहताच उपस्थितांचा जोरदार जल्लोष; नेत्यांनी दाखविली राजकीय प्रगल्भता...

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संशयिताने फोनवरून संपर्क साधला आणि राहुल गांधी यांना मध्यप्रदेशात गोळ्या मारून अथवा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.

याची शहर गुन्हेशाखेकडून गंभीर दखल घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी संशयिताला मद्याचे व्यसन असून, त्याच्या मानसिकतेवरही परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मद्याच्य नशेमध्येच त्याने पोलिसांना फोन केला होता.

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : हवामान बदल? गंभीर पाठोपाठ आणखी एका दिल्लीच्या खासदाराने ठोकला राजकारणास रामराम, सांगितलं कारण

दरम्यान, यासंदर्भातची माहिती शहर गुन्हे शाखेकडून केंद्रीय सुरक्षा यंत्रणेसह गृहविभागालाही पुरविण्यात आली आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचे समजते. तसेच, येत्या काही दिवसात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मालेगाव, नाशिक मार्गे ही यात्रा मुंबईकडे रवाना होणार आहे. या दरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल अशी माहिती शहर पोलिसांनी दिली आहे

दरम्यान, राहुल गांधी यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यामध्ये संबंधित व्यक्तीसाठी १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडे आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ जवान तैनात असतात. सुरक्षा व्यवस्थेमधले कमांडो २४ तास डोळ्यात तेल घालून सुरक्षा पुरवत असतात. प्रत्येक कमांडो मार्शल आर्टचा स्पेशालिस्ट असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com