Nashik Crime News : गोमांस बाळगणाऱ्या संशयिताना अटक; 1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

Nashik Crime News : गोमांस बाळगणाऱ्या संशयिताना अटक; 1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त

लासलगाव (जि. नाशिक) : शुक्रवारी (ता. ३) शहरातील बाजारतळ येथे गोमांस असलेली हुंडाई कंपनीची सेंट्रो कार विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्याने याबाबत लासलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.

या घटनेतील पाच संशयितांपैकी दोघा संशयिताना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदर वाहन जप्त करण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी दिली.

या घटनेमुळे लासलगाव शहरात दुपारपर्यंत काही काळ तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. (Suspects carrying beef arrested 1 lakh 59 thousand worth of goods seized Nashik Crime News)

येवला येथून लासलगाव बाजारतळ येथे आलेली सेंट्रो कार (एमएच ०२-एपी-७३९) या काळ्या रंगाच्या गाडीत शहरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना गोमांस असल्याचे लक्षात आले. सदर गोमांस या भागातील इसाक गफूर शहा यांच्या घरात उतरवून त्याची शहरात विक्री केली जाणार होती.

गाडीतील गोमांस उतरवून ठेवत असताना बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे, व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीसह सुमारे एक लाख ५९ हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

पोलिसांनी आलीम सलीम मोहम्मद, अरबाज मोहम्मद युसूफ (रा. येवला) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, या गुन्ह्यातील संशयित एजाज युसूफ कुरेशी (रा. येवला), इसाक गफूर शाह व मंगला नेटारे (रा. लासलगाव) यांचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, लासलगाव पोलिस कार्यालयात गोमांस बाळगणाऱ्या संशयितांना आणल्यानंतर काही नागरिक त्यांचे समर्थनार्थ जमा झालेला असताना विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तसेच शहरातील काही तरुण एकत्रित समोरासमोर आल्याने शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.