The Ganga Bhagirathi temple on Ramtheerth was opened on the occasion of Kartik Poornima.
The Ganga Bhagirathi temple on Ramtheerth was opened on the occasion of Kartik Poornima.esakal

Nashik : स्‍वयंभू गोदावरी- भागीरथी मंदिरात दुर्मिळ पर्वणी

नाशिक : मंदिराचे शहर म्‍हणून नाशिकची जगभरात ओळख आहे. येथील प्रत्‍येक मंदिराचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहेत. रामतीर्थावर असलेले असेच श्री सिंहस्‍थ गौतमी गंगा- गोदावरी भागीरथी मंदिरात दर्शनाची दुर्मिळ पर्वणी भाविक साधत असतात. कुंभमेळा काळात तसेच वर्षात ज्‍येष्ठ शुद्ध दशमी अन् कार्तिक पौर्णिमा असे दोन दिवस मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले होते. (Swayambhu Rare Parvani at Godavari Bhagirathi Temple nashik Latest Marathi News)

रामतीर्थावरील मंदिरात गोदावरी माता मूर्ती व काशीची भागीरथी गंगा माता मूर्ती स्‍थापित आहेत. ठराविक मुहूर्तावर मंदिर खुले होत असले तरी वर्षभर नित्‍याचे येथे पूजा होते. मंदिराचे द्वार बंद ठेवले जात असल्‍याने बाहेर असलेल्या पादुकांची चरण पूजा केली जाते. कुंभमेळ्यात मंदिरात भाविकांसह देशभरातील साधू- महंतदेखील येत असतात. देशभरातील पवित्र नद्यांचे जल आणून गोदा मातेच्‍या चरणी अर्पण केले जाते. वर्षभरात दोनदा दर्शनाची संधी भाविकांना उपलब्‍ध होते. ज्‍येष्ठ शुद्ध दशमी (प्रकट दिन) आणि कार्तिक पौर्णिमा (देव दिवाळी) असे दोन दिवस दर्शनाची संधी भाविकांना उपलब्‍ध होते. योगायोगाने दर्शन मिळालेले भाविक स्वतःला भाग्‍यवंत समजतात.

मंदिराचे धार्मिक महत्त्व

गोदावरी मातेचे देशभरात अनेक मंदिर असले तरी स्‍वयंभू मूर्ती असलेले एकमेव मंदिर आहे. तसेच मूर्तीसमोर गौतम ऋषींची मूर्ती असलेलेदेखील हे एकमेव मंदिर आहे. अनेक अर्थाने या मंदिराचे धार्मिक महत्त्व आहे.

The Ganga Bhagirathi temple on Ramtheerth was opened on the occasion of Kartik Poornima.
MSRTC Income During Diwali : दिवाळीच्या कमाईत लालपरी सुसाट!

कुंभमेळ्यात दोन किलोमीटरपर्यंत रांगा

कुंभमेळ्यातील पर्वणी काळात स्‍नानासाठी आलेले भाविक आवर्जूनच मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे दर्शनासाठी तब्‍बल दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागत असल्‍याचे जाणकार सांगतात. त्यामुळे पंधरा ते वीस तासांच्‍या प्रतीक्षेनंतर भाविकांना गोदावरी मातेचे दर्शनाचा लाभ होत असल्‍याचेही सांगण्यात येते.

"स्‍वयंभू मूर्ती असलेल्‍या गौतमी गंगा गोदावरी भागीरथी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी कुंभमेळा काळात व वर्षातून दोनवेळा खुले होते. अनेक अर्थाने मंदिराला धार्मिक महत्त्व असून, भाविकांच्‍या दर्शनासाठी रांगा लागतात. मंदिर बंद असताना नित्‍याचे चरण पूजा केली जाते."
- रामचंद्र शुक्‍ल, पूजारी.

The Ganga Bhagirathi temple on Ramtheerth was opened on the occasion of Kartik Poornima.
Wedding Season: नियोजनासाठी लग्नघरी लगबग सुरू; 26 नोव्हेंबरपासून लग्नाचा धूमधडाका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com