Nashik News : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Nashik News : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

नाशिक : सय्यद पिंप्री ते दहावा मैल या दरम्यान भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मंगेश भगवान आंभोरे (१८, रा. सय्यद पिंप्री), विष्णू संपत जोंधळे (४५, रा. सय्यद पिंप्री) असे दोघा मृतांची नावे आहेत. (Syed Pimpri 10th Mile 2 bike riders were killed in collision with speeding truck nashik news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अपघात शुक्रवारी (ता. ३) सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडला आहे. सय्यद पिंप्री ते दहावा मैल या दरम्यान, भरधाव वेगातील ट्रकने (आरजे- १४- जीजे- २८७६) दुचाकीला जोरात धडक दिली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या भीषण अपघातामध्ये मंगेश व विष्णू हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळता तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikaccidentTruck