esakal | तलाठ्याची करामत! पत्नीला वारस लावत हडपले चक्क पावणे ४ लाखांचे शासनाचे अनुदान
sakal

बोलून बातमी शोधा

money

तलाठ्याची करामत! पत्नीला वारस लावत हडपले शासनाचे अनुदान

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : जमीन नसतानाही पिकांचे खोटे पंचनामे करत नैसर्गिक आपत्तीचे नुकसान दाखवून पत्नीच्या नावे लाभ घेत सुमारे पावणे चार लाख रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केला. काय घडले नेमके?

मृत दाखवत पत्नीला वारस लावत हडपले शासनाचे अनुदान

कुसमाडी येथील गट क्रमांक ३८८, ३६९ या जमीनीचे मालक खंडू अहिरे व इतर तिघांना मृत दाखवून त्यांनी पत्नी अरुणा गाजरे हिच्या नावे वारस दाखवून नोंद केली. सावरगाव येथील गट क्रमांक ५७/३ या जमीनीचे मालक राधाकिसन कदम मृत झाल्यावर त्यांची वारस म्हणून जमीन पत्नीच्या नावे बेकायदेशीररीत्या नोंद केली होती. विशेष म्हणजे याचे नोंदीचे कागदपत्रे देखील त्यांनी गहाळ केली आहेत. कुसमाडी सजेतील दहेगाव पाटोदा, नायगव्हाण, सावरगाव येथे जमीन नसतानाही पिकांचे खोटे पंचनामे करत २०१३ ते २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचे नुकसान दाखवून पत्नीच्या नावे लाभ घेत ३ लाख ७८ हजार ६२० रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केला आहे. पत्नी अरुणा जगन्नाथ गांजरे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेस पात्र नसतांनाही ८ हजार रुपयांचा लाभ घेतला आहे. या तलाठ्याची बदली झाल्यावर मॅटमध्ये धाव घेत मॅटची दिशाभूल केल्याचेही निलंबन आदेशात म्हटले आहे. बेकायदेशीररीत्या वारसदारांची जमीन पत्नीच्या नावावर करण्यासह निधी हडप करण्याप्रकरणी थूल याच्यावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र अजूनही सदर तलाठी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

हेही वाचा: छोटा राजनच्या 'त्या' धमकीला भीकही घालत नाही - आ. कांदे

करामती तलाठी अखेर निलंबित

कुसमाडी व हडप सावरगाव येथील शेत जमीनी मूळ वारसदारांच्या नावे करण्याऐवजी ती जमीन पत्नीच्या नावे करणारा तसेच पिकांचे खोटे पंचनामे दाखवून शेतकऱ्यांना मिळणारी नैसर्गिक आपत्तीची मदत परस्पर पत्नीच्या नावे लाटणारा करामती तलाठी अतुल थूल याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. प्रांताधिकारी सोपान कासार तसा आदेश काढला आहे. दरम्यान या गुन्ह्याप्रकरणी थूल यांच्यावर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला आहे.

आता पिंपरीत काय?

पिंपरी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे व फळ पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी शासनाकडून अनुदान अनुदानही मंजूर झालेले आहे. मात्र तेसंबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून त्याची दखल घेऊन तहसीलदार प्रमोद हिले यांनी या ठिकाणी अनुदान यादीचे चावडी वाचन करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांची नेमणूक केली आहे. येथे देखील अनुदान हडप करण्याचा गोंधळ उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: नाशिक : गंगापूर धरणातून होणार मोठ्या प्रमाणात विसर्ग

loading image
go to top