Nashik News : जउळके दिंडोरी शिवारात बिबट्याचा थरार; पत्नीच्या प्रसंगावधानामुळे शेतकऱ्याचे प्राण वाचले

Tanaji Jondhale leopard attack news : वणी (नाशिक)–दिंडोरी शिवारातील शेतात तानाजी जोंधळे (वय ४४) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. पत्नीच्या आरडाओरडेमुळे वाचले, गंभीर जखमी जखमी, वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
Tanaji Jondhale leopard attack news

Tanaji Jondhale leopard attack news

sakal

Updated on

​वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील जउळके दिंडोरी शिवारात मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या शेतात गव्हाला पाणी देणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने भीषण हल्ला चढवला. तानाजी खंडेराव जोंधळे (वय ४४) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने, सोबत असलेल्या पत्नीने मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली, ज्यामुळे जोंधळे यांचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेमुळे दहावा मैल परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com