वादळामुळे पक्ष्यांचे संसार वाऱ्यावर! घरटी तुटली, अनेक पक्षी जखमी

bird nest
bird nestesakal

नाशिक : तौक्ते चक्रीवादळ (tauktae) आणि अवकाळी पावसाने पक्ष्यांची घरटी तुटली (bird nest broken) असून, अनेक पक्षी जखमी (injured bird) झाले आहेत. मे आणि जूनमध्ये पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असल्याने निसर्गचक्रातील महत्त्वाचा घट असलेले पक्षी भेदरलेले आहेत. त्यांच्यावर कुणी घर देता घर...असं म्हणण्याची वेळ आली. एवढेच नव्हे, तर जखमी पक्ष्यांवर इलाज करण्यासाठी ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर' ची घोषणा झाली खरे, परंतु हे सेंटर सुरु होण्याची प्रतीक्षा पक्षीमित्रांना कायम आहे. (storm injured many birds)

‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर' सुरु होण्याची प्रतीक्षा

विणीच्या हंगामामुळे अनेक वृक्षांवर पक्ष्यांनी घरटी बनवली आहेत. काही पक्षी इमारतीच्या पाइप, टेरेस गार्डनमधील कुंड्यांमध्ये घरटी बनवल्याचे दिसून येते. बुलबुल, तांबट, सूर्यपक्षी, मुनिया, कावळे, चिमणी, साळुंकी, भारद्वाज, दयाळ, पोपट, शिंपी, पाकोळी, रामगंगा आदी पक्ष्याचा त्यात समावेश आहे. शहरात मोठ्या वृक्षांची संख्या कमी होत असताना आणि चाळी-वाड्यांच्या जागेवर सिमेंटची जंगले उभी राहत असल्याने पक्ष्यांना घरटी बनविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पक्षी टेरेसमधील कुंड्यांमध्ये घरटी बनवू लागले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पक्ष्यांच्या अशा घरट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरटी जमिनीवर पडल्यावर पक्षिमित्रांनी ती घरटी पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे पक्षी खाली पडल्यामुळे ती जखमी झालेत. तांबट, कबूतरे, घार, शराटी, राखी धनेश आदी पक्ष्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

bird nest
इथे मृत्यूदर वाढतोय; शहरातील नऊ रुग्णालयांना नोटिसा

वनविभागाची हेल्पलाइन

घरटी तुटलेले पक्षी : बुलबुल, सूर्यपक्षी, मुनिया, कावळे, साळुंकी, भारद्वाज, दयाळ,शिंपी.

जखमी पक्षी आढळल्यास वन विभागाशी संपर्क करण्यासाठीची हेल्पलाइन क्रमांक ः १९२६

नाशिकमध्ये कुठे जखमी पक्षी आढळल्यास वनविभाग अथवा पक्षीमित्रांना संपर्क साधावा. छोटी पिले घरात न ठेवता पुन्हा त्यांच्या घरट्यात कशी ठेवता येतील, यासाठी प्रयत्न करावा. त्यांना बळजबरीने पाणी अथवा खाद्य देवू नये. ती घाबरलेली असल्याने त्यांना अधिक स्पर्श न करता एकाच ठिकाणी ठेवावे.- रूपाली जोशी (पक्षीमित्र)

bird nest
रेमडेसिव्हिरनंतर आता 'ॲम्फोटेरिसिन' साठी धावपळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com