Nashik News : मालेगावाला मनपाकडून 3 रुपयांची करवाढ! करवाढीला आयुक्तांची मंजुरी

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Malegaon Municipal Corporation latest marathi newsesakal

Nashik News : महानगरपालिका हद्दीतील नव्याने होणाऱ्या मिळकती वाढीव बांधकामे, वापरात बदल, भाडेकरी, भूखंड, जमिनी आदींचे कर योग्य मूल्य ठरविताना बांधकामाच्या प्रकारानुसार निवासी, अनिवासी, वाणिज्य वापरामध्ये २०१५-१६ मधील कर वाढीच्या मंजूर दरामध्ये प्रती चौरस स्केअरफुट तीन रुपये अल्पशी वाढ करण्याचा प्रशासकीय ठराव प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी मंजूर केला आहे.

या मिळकत कर आकारणी संदर्भात काही तक्रारी असल्यास आवश्‍यक कागदपत्रांसह संबंधित विभागीय कार्यालयात ५ जून २०२३ पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन कर उपायुक्त हेमलता डगळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. (Tax increase of 3 rupees from Malegaon Municipality Commissioner approves tax hike Nashik News)

कर आकारणीपूर्वी आवश्यक असलेल्या नोंदी, व्यवहार्यपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. यासाठी २०२२-२३ पुस्तकातील नोंदी नवीन वर्षाच्या नोंदी म्हणून २०२३-२४ करिता स्वीकारल्या आहेत. मालमत्ता कर आकारणी पुस्तक (नोंदवही) महानगरपालिकेच्या पूर्व, मालेगाव पश्चिम, या विभागीय कार्यालयात मिळकतीची माहिती मिळकतधारक / भोगवटादार यांना पाहण्यासाठी चारही प्रभाग कार्यालयात उपलब्ध आहे.

याबाबत तक्रार अथवा हरकत घ्यावयाची असल्यास, त्यांचे कारणासह लेखी स्वरूपात, आवश्यक कागदपत्रास संबंधित विभागीय कार्यालयात समक्ष अथवा पोस्टाद्वारे तक्रार करावी असे आवाहन कर विभागाने केले आहे.

हरकत अर्ज करताना चालू वर्षासह कराची थकबाकी भरल्याखेरीज तक्रार अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. मिळकतीबाबत यापूर्वी ज्या कारणात्सव निकाल दिलेला आहे, अशा प्रकारचे तत्सम मुद्यांचे पुर्न: अर्ज तसेच नियम १६ (२) प्रमाणे ज्या कारणांवरून मूल्यनिर्धारण विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे,

ती कारणे आवश्यक कागदपत्रांसह थोडक्यात, परंतु संपूर्णपणे नमुद करण्यात आली पाहिजेत. अन्यथा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. मुदतीत न येणाऱ्या हरकत अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्रत्येक मिळकतीच्या हरकतीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Water Crisis: आदिवासी भागात पाण्यासाठी महिलांची पायपीट; इगतपुरी तालुक्यातील वाड्यापाड्यांवर मे महिन्यातच झळा!

या संदर्भात करता येतील तक्रारी

- इमारतीचे व जमिनीचे करयोग्य मूल्य चुकीची नोंद

- घर क्रमांक, पत्ता व मिळकत नोंद चुकीची असल्यास

- इमारत अथवा जमिनीवर मालमत्ता कर देण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव चुकले असेल तर

- बांधकाम परवानगीचा समावेश केलेला नसल्यास.

- जमीन अथवा इमारतीचे भाडे मूल्यात वाढ अथवा घट केली असल्यास.

- इमारत अथवा तिचा काही भाग निष्काशित केला असल्यास किंवा इमारत अस्तित्वात नसल्यास.

- मिळकतीचा वापरात बदल केल्यास तसेच मिळकतीचा भाडेतत्वावरील वापर, मालकी तत्त्वावर सुरु असल्यास.

- खुल्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम पूर्ण करून बांधीव मिळकतींवर मालमत्ता कर लागू असल्यास

- खुल्या भूखंड (ओपन प्लॉट) वरील कर रद्द करणे बाबत.

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Unseasonal Damage: नांदगावला शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत; घाटमाथ्यावर 1788 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com