नाशिक: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कारासाठी १५ तालुक्यातून ३५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पडताळणीनंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे पाठविण्यात येतील. शिक्षक दिनी तालुकानिहाय एका शिक्षकास गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो.