esakal | विद्यामंदिरातच शिक्षकाचा दारूचा अड्डा! शाळेतच झिंगाट VIDEO व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

teacher drunk nashik

विद्यामंदिरातच शिक्षकाचा दारूचा अड्डा! शाळेतच झाले झिंगाट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : शाळा म्हणजे ज्ञानमंदिर... या पवित्र स्थळी विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना भावी नागरिक बनविण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षकाला एका कुंभाराप्रमाणे भूमिका निभवावी लागते. कारण शिक्षकांच्या विचारांचा प्रभाव थेट विद्यार्थ्यांचे सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टीवर पडत असतो. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडतात अन् देशाचे भवितव्य ठरवितात. पण हेच गुरूजी जेव्हा या पवित्र स्थळाचे पावित्र्य राखत नाही, तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य तर धोक्यात येतेच. पण गुरू-शिष्याच्या नात्याला कलंक लागतो. असाच एक प्रकार नाशिक त्र्यंबकेश्वर येथील एका शाळेत घडला आहे. इथल्या गुरूजींनी चक्क शाळेतच मद्यपान करून झिंगाट झाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काय घडले पुढे...पाहा... (teacher-drunk-nashik-school-video-viral-marathi-news)

सोशल मिडियावर VIDEO चांगलाच व्हायरल

सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होणारा व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील दापूरे गावातील असल्याची माहिती मिळतेय. गावकऱ्यांनी शिक्षकाच्या या कृत्याचा निषेध केला संबंधित शिक्षक दापूरे गावातील ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकवतो. लॉकडाऊन असल्यानं शाळा बंद असल्याने या शिक्षकानं शाळेलाच आपले दारुचा अड्डा बनवला आहे. दारू पिऊन मद्यधुंद झालेल्या शिक्षकाला आपण कुठे आहोत? काय करत आहोत? याचेही भान उरलं नसल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अशातच या गावातील नागरिकांनी या शिक्षकाची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते.

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

हेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

loading image