Teacher Transfer Procedure : शिक्षक बदलीतंर्गत शाळांचा प्राधान्यक्रम अर्ज भरणे सुरू

Application writing
Application writingesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेतील २०२२ मधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रीयेतंर्गत बदलीसाठी शिक्षकांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणीस बुधवारपासून (ता.२१ प्रारंभ झाला आहे. तीन दिवसात प्रमाणपत्रांची पडताळणी करून अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सादर केला जाणार आहे. (Teacher Transfer Procedure Priority application of school under teacher transfer started Nashik News)

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग एक अंतर्गत पात्र ठरलेल्या ५०४ शिक्षकांना बुधवारपासून जास्तीत जास्त ३० शाळांचा प्राधान्यक्रम (ऑप्शन फॉर्म) भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी शिक्षकांना शनिवार (ता.२४) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. एकाच शाळेत पाच वर्षे किंवा सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांमध्ये १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली करण्यात येणार आहे.

त्यासाठी एकूण चार संवर्ग करण्यात आलेले आहेत. संवर्ग-१ अंतर्गत दीर्घ आजार, दिव्यांग अशा दोन हजार १४० शिक्षकांनी अर्ज सादर केला होता. त्यापैकी ५१३ शिक्षकांनी बदलीस होकार दिल्यानंतर त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तालुकास्तरावर तपासण्यात आले.यात ९ शिक्षकांचे अर्ज अपात्र ठरल्यानंतर ५०४ शिक्षकांना ऑप्शन फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. उर्वरित १६३६ शिक्षकांनी बदली करण्यास नकार कळवला आहे. संवर्ग-२ अंतर्गत २१३ शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या संवर्गात पती-पत्नी एकत्रिकरण केले जाते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Application writing
Nashik News : बिलांचे ठराविक ठेकदारांनाच वाटप; इंजिनिअर्स असोसिएशनची अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार

त्यामुळे बदली अर्जासोबत शिक्षकांना पती व पत्नी या दोघांच्या शाळेतील अंतर ३० किलो मिटरपेक्षा जास्त आहे किंवा नाही, याचा दाखला जोडावा लागतो. संवर्ग-१ व संवर्ग-२ यांच्यासह संवर्ग-३ अर्थात बदली अधिकार प्राप्त ठरणार्‍या १ हजार २९१ शिक्षकांची आणि संवर्ग-४ अंतर्गत बदलीस पात्र ठरणारे ९८२ शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रसिध्द केली आहे.

तालुकास्तरावरून वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्यानंतर जिल्हास्तरावरून पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा रूग्णालयात समितीकडून या पडताळणीला सुरूवात झाली आहे. साधारण तीन दिवसात ही पडताळणी होईल असा अंदाज आहे.

Application writing
Sammed Shikhar Pilgrimage Case : झारखंड सरकारचा जैन धर्मियांकडून निषेध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com