Teacher Transfer Procedure : जिल्हयातील 177 शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची आज पडताळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Transfer Procedure

Teacher Transfer Procedure : जिल्हयातील 177 शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची आज पडताळणी

नाशिक : जिल्हा परिषदेतील २०२२ मधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रीयेतंर्गत बदलीसाठी शिक्षकांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. जिल्हाभरातील हदय शस्त्रक्रीया- ६९ आणि इतर आजार १०८ अशआ एकूण १७७ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची बुधवारी (ता.२१) जिल्हा रूग्णालयातील समितीकडून पडताळणी होईल. ही पडताळणी झाल्यानंतर शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अंतिम होणार आहे. (Teacher Transfer Procedure Verification of medical certificates of 177 teachers in district today nashik news)

आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रीया सुरू आहे. यात शिक्षक यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात येते. मात्र, अनेक शिक्षकांकडून सोईच्या बदलीसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत. यातच नाशिक जिल्हा रूग्णालयातील बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर गाजले. त्यामुळे शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिलेले होते.

यातच, आमदार बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेने देखील शिक्षण विभागास पत्र देत, शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली होती. अनेक शिक्षकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे बोगस असल्याचा आरोप संघटनेने केला होता. संबंधित शिक्षकांनी सध्याच्या व यापूर्वीच्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे, प्रमाणपत्र, वैद्यकीय अहवाल तसेच आॅनलाईन बदलीफॉर्म (सांक्षाकीत केलेल्या दोन प्रती) इत्यादीसह समक्ष उपस्थित रहावे असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik News: अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंग रोडबरोबरच उड्डाणपूल; ‘Resilient India’चा सर्वेक्षण अहवाल

हदय शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

बागलाण (११), चांदवड (५), देवळा (३), दिंडोरी (१२), इगतपुरी (७), कळवण (३), मालेगाव (५), नाशिक (१०), निफाड (४), पेठ (५), सुरगाणा (२), येवला (१).

इतर आजारांबाबत प्रमाणपत्र

बागलाण (८), चांदवड (१), देवळा (३), दिंडोरी (९), इगतपुरी (६), कळवण (१३), मालेगाव (६), नाशिक (१६), निफाड (१३), पेठ (६), सुरगाणा (२), येवला (११), नांदगाव (४), सिन्नर (६), त्र्यंबकेश्वर (४).

हेही वाचा: Nashik News : PFI विरोधातील गुन्ह्याच्या तपासात मुदतवाढ

टॅग्स :NashikteacherTransfers