नाशिक- तहसीलदारपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बारा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मुंबई नाका परिसरात घडली. अक्षय अनिल झंवर (रा. निर्माण उपवन, सीतागुंफा, ढिकलेनगर) यांच्या फिर्यादीवरून अतुल पेठकर, वजीर मुजावर, सोनाली (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांवर अपहार व फसवणूक केल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.