वाढत्या तापमानाने मालेगावकर घामाघूम; उष्णतेच्या लाटेची शहरवासियांना चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

temprature

मालेगाव शहरातील तापमानाचा पारा वाढला; उष्णतेच्या लाटेची चिंता


मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात किमान चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला होता. त्याची प्रचिती शहरवासियांना बुधवारी (ता. १६) आली. शहरातील तापमानातील पारा आज ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. दुपारी बारापासूनच उन्हाचा चटका असह्य होत होता. मंगळवारी शहरात ३८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यातही पारा आज दोन अंश सेल्सिअसने वाढला. त्यामुळे मालेगावकर घामाघूम झाले होते.

शहरातील तापमानाचा पारा वाढला

कडाक्याचे ऊन व उष्णतेच्या लाटेमुळे बाहेर पडलेल्या अनेकांना टोपी, उपरणे, गॉगल यांचा सहारा घ्यावा लागला. आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडणे टाळावे. अथवा योग्य ती काळजी घेऊनच कामानिमित्त घराबाहेर पडावे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात तापमानाने अचानक उसळी घेतल्याने शीतपेय विक्रेत्यांचा चांगलाच व्यवसाय झाला. सायंकाळी लस्सी, रसवंती, आईस्क्रीम, कुल्फी, बर्फगोळा, मसाला ताक विक्रेत्यांकडे गर्दी दिसून आली. शहरातील प्रसिद्ध कुल्फी विक्रेत्यांच्या कुल्फी सायंकाळी हातोहात संपल्या. विविध रसवंतींच्या घुंगरांचा आवाज रात्री उशिरापर्यंत सुरु होता. विविध महत्वाचे कामकाज, शालेय, शासकीय कामकाज व परीक्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक इच्छूक स्थळी पोहोचल्यानंतर वृक्षाखाली आसरा शोधताना आढळून आले.

हेही वाचा: अवकाळीने कांदा गडगडला; दर घसरल्याने शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

हेही वाचा: नाशिक : नदी प्रदूषण मुक्तीसाठी; कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट

Web Title: Temperature Rises In Malegaon City Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top