esakal | ग्राहकांच्या शोधात बासरीविक्रेते! मंदिर बंद, उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

flute seller

ग्राहकांच्या शोधात बासरीविक्रेते! मंदिर बंद, उपासमारीची वेळ

sakal_logo
By
योगेश सोनावणे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव (जि.नाशिक) : मंदिरांच्या भरवशावर अवलंबून असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. मंदिरावर प्रसाद साहित्याची दुकाने अवलंबून आहेतच. परंतु यासोबतच हातविक्री करीत उपजीविका करणारे लहान-मोठे व्यावसायिकही ग्राहकांच्या शोधत आहेत. बासरीतून सुंदर स्वर बाहेर पडत असले, तरी हे सुंदर स्वर या वेळी रोजच्या भाकरीचीही सोय करू शकत नाही. कारण त्यासाठी बासरींची विक्री होणे आवश्यक आहे. मंदिराखाली ग्राहकांच्या शोधात बासरी विक्रेते फिरत आहेत.

मंदिर बंदमुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

सप्तशृंगगडावरील शिवालय तलाव परिसरात तसेच, बाजारपेठेत ऐकू येणारा बासरीचा सुमधुर आवाज भाविकांसह पर्यटकांना आकर्षित करीत असतो. परंतु, सध्या याच आवाजाचे गुंजन विक्रेत्याला बासरीचे ग्राहक आकर्षित करण्यास कमी पडत आहेत. दर वर्षी यात्रेत शेकडोंच्या संख्येने होणारी बासरींची विक्री दोन वर्षांपासून यात्रोत्सव रद्द झाल्याने अल्पशी ठरली आहे. त्यामुळे आर्थिक घडी विस्कळित झाल्याने बासरी विक्रेत्यांना चिंतेने ग्रासले आहे. ‘बांसुरी के सूर से हमारा जीवन जुडा हुआ है, पुरे सूर तो नहीं आते, फिर भी कोशिश तो करनी पडती है’ असे म्हणत बासरीच्या सुरात जीवन जगण्याची आशा बाळगणारे विक्रेते बासरी विक्रीसाठी सप्तशृंगगडावर येतात. दोन वर्षांपासून यात्रोत्सव रद्द झाल्याने बासरी घेण्यासाठी ग्राहक सापडत नाहीत. त्यामुळे पुढील अर्थार्जनाची चिंता त्यांना सतावत आहे. मंदिराभोवती चौकाचौकांत बासरीतून सुंदर व सुमधुर स्वर बाहेर पडत असले तरी हे स्वर भाकरीची एक वेळही भागवत नाहीत. त्यासाठी बासरींची विक्री होणे आवश्यक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिककरांनो सावधान! डेंगी, चिकुनगुनियाचा उद्रेक

दोन पैसे मिळाले, तरच सायंकाळी काहीतरी खायला मिळेल. मंदिर बंद असल्यामुळे भाविकही गडावर येत नाहीत. मंदिर सुरू झाले तर सर्व काही पूर्वपदावर येईल.
- राजन पैठाण, बासरी विक्रेता

हेही वाचा: मैत्रीचा हात कायमचा सुटला; दुचाकीला कारची जोरदार धडक

loading image
go to top