esakal | 2 मैत्रिणींचा मैत्रीचा हात कायमचा सुटला; रस्त्यातच काळाने घेरले
sakal

बोलून बातमी शोधा

surekha

मैत्रीचा हात कायमचा सुटला; दुचाकीला कारची जोरदार धडक

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : दुचाकीवर जाणाऱ्या दोन मैत्रिणींचा (friends) मैत्रीचा घट्ट हात कायमचा सुटला. जयभवानी रोड येथील फर्नांडिसवाडी येथे रविवारी (ता.७) ही घटना घडली. उपनगर पोलिस ठाण्यात (upnagar police station) गुन्हा दाखल झाला आहे.

दोन मैत्रिणींचा मैत्रीचा घट्ट हात कायमचा सुटला.

बेलतगव्हाण येथील पोलिस पाटील दिनेश धुर्जड यांनी अपघाताबाबत पोलिसात तक्रार दिली. रविवारी (ता.६) सायंकाळी सातला त्यांची बहीण सुरेखा दिलीप शिंदे (वय ३८, रा.माऊली नगर, बेलतगव्हाण) व तिची मैत्रीण गायत्री रविवी गंधारे या ॲक्टिव्हा दुचाकीवर (एमएच १५ जीसी ५६३६) घरी जात होत्या. जयभवानी रोड फर्नांडिसवाडी येथे फोल्ड फिगो कार चालकाने (एमएच ०२ सीबी ९३२१) निष्काळजीपणे गाडी चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. सुरेखा शिंदे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायत्री गंधारे जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: शिपायाच्या मुलाला मिळणार नोकरी; उच्च न्यायालयाचा निकाल

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दुचाकीवर जाणाऱ्या दोन मैत्रिणींना फोल्ड फिगो कारने जोरदार धडक दिल्याने एक मैत्रीण जागीच ठार झाली. जयभवानी रोड येथील फर्नांडिसवाडी येथे रविवारी (ता.७) हा अपघात झाला. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: पोलिसांची दक्षता अन् टळला अनर्थ! नाशिकमधील घटना

loading image
go to top