esakal | रेमडेसिव्‍हिरनंतर प्‍लाझ्माचाही काळाबाजार; 10 ते 15 हजारांची होतेय मागणी

बोलून बातमी शोधा

Plasma

रेमडेसिव्‍हिरनंतर प्‍लाझ्माचाही काळाबाजार; 10 ते 15 हजारांची होतेय मागणी

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : ऑक्सिजन व रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनपाठोपाठ (Remedesivir Injection) आता जिल्ह्यात प्‍लाझ्माचाही (Plasma) काळाबाजार होत असल्‍याचे काही प्रकरणांतून समोर येत आहे. काही तरुणांकडून तब्‍बल दहा ते पंधरा हजार रुपयांची मागणी रुग्‍णाच्‍या नातेवाइकांकडून केली जात आहे. या रॅकेटच्‍या केंद्रस्‍थानी दोन युवक असून, त्‍यांच्या चौकशीतून या धंद्याशी गुंतलेली आणखी काही नावे समोर येण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. (Ten to fifteen thousand is being demanded in the district in exchange for plasma)


कोरोना बाधितांवर उपचारासाठी नातेवाइकांकडून सर्वोत्‍परी प्रयत्‍न केले जात आहेत. रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन मिळविण्यासाठी मर्यादा येत असताना डॉक्‍टरांकडून प्‍लाझ्माचा पर्याय सुचविला जातो. अशात रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची धावपळ होते आहे. या अडचणीचा फायदा काही युवकांकडून उचलला जातो आहे. प्‍लाझ्मा रक्‍तपिशवीकरीता ठरलेली रक्‍कम न दिल्‍याने दोन युवकांनी सिन्नर येथील खासगी रुग्‍णालयात छऱ्याच्या नकली बंदुकेने धाक दाखवत दमबाजी केली होती. याच युवकांकडून नाशिकमध्येही रॅकेट चालविले जात असल्‍याची खळबळजनक माहिती समोर येते आहे.

हेही वाचा: जिल्हाबंदीचे तीन तेरा आणि 'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!रक्‍तदात्‍याच्‍या नावाने पैशांची मागणी

प्लाझ्मा रक्‍तपिशवीकरिता शासनाने दर निश्‍चित केलेले आहेत. अशात रुग्‍णांच्‍या नातेवाईकांकडून जादाचे पैसे उकळण्यासाठी विविध कारणे सांगितली जात आहेत. रक्‍तदात्‍यांना आपण पाच हजार रुपये देत असतो, असा दावा या युवकांकडून केला जातो आहे. हे प्रकरण अत्‍यंत गंभीर होत चालले असून, काही रक्‍तपेढीतील कर्मचाऱ्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग नाकारता येणार नाही. अशा स्‍थितीत पोलिस यंत्रणेकडून कसून चौकशी व्‍हावी, अशी मागणी होत आहे.

Ten to fifteen thousand is being demanded in the district in exchange for plasma

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला