esakal | महापालिकेच्या शिक्षण समितीची मुदत संपुष्टात; नवीन सदस्यांची लवकरच घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

nashik-nmc_201909294551.jpg

गेल्या वर्षी २० जानेवारीला शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती झाली होती. फेब्रुवारी महिन्यात सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. त्यानंतर कोरोनाची लाट आल्याने लॉकडाउन जाहीर केले होते.

महापालिकेच्या शिक्षण समितीची मुदत संपुष्टात; नवीन सदस्यांची लवकरच घोषणा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीची मुदत येत्या २० जानेवारीला संपुष्टात येणार असून, नवीन सदस्यांची नियुक्ती मंगळवारी (ता. १९) होणाऱ्या महासभेत होणार आहे. 

नवीन नऊ सदस्यांची मंगळवारी घोषणा

गेल्या वर्षी २० जानेवारीला शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती झाली होती. फेब्रुवारी महिन्यात सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. त्यानंतर कोरोनाची लाट आल्याने लॉकडाउन जाहीर केले होते. त्यामुळे प्रभाग समिती सभापतीसह महिला व बालकल्याण, आरोग्य, विधी व शहर सुधार समिती सदस्यांची नियुक्ती लांबली होती. ऑक्टोबर महिन्यात शासनाच्या परवानगीनंतर सदस्य नियुक्ती जाहीर होऊन सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. एकमेव शिक्षण समिती कार्यरत होती. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

भाजपचा एक सदस्य कमी होण्याची शक्यता

विशेष म्हणजे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून आतापर्यंत शाळा सुरू न झाल्याने महापालिकेच्या शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला होता. कोरोनामुळे समितीच्या बैठका ऑनलाइन झाल्या. आता समितीची मुदत संपुष्टात येत असल्याने नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य घोषित केला जाणार आहे. मात्र, तौलनिक संख्या बळानुसार सदस्य नियुक्तीच्या सूचना दिल्यास भाजपचा एक सदस्य कमी होण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?