पारंपारिक वस्तूंची आजही मागणी
पारंपारिक वस्तूंची आजही मागणीesakal

विवाह समारंभात पारंपारिक वस्तूंचे महत्त्व आजही टिकून

नरकोळ (जि. नाशिक) : विवाह समारंभात आमूलाग्र बदल होत असले तरी पारंपरिक वस्तूंचे महत्त्व आजही कायम आहे. यात मातीचे खापर, चूल, केरसुणी, टोपली, सूप, बेळमाथणी या वस्तूंचे पूजन विवाह समारंभात केले जाते. या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

मातीच्या खापरीला विशेष महत्त्व

विवाह समारंभाचा पहिला दिवस हा घरापुढे मांडव टाकल्यानंतर पूजाविधी करण्याची लगबग सुरू होते. यात नव्या मातीच्या खापरीला विशेष महत्त्व आहे. या खापरीवर व चुलीवर पुरणाच्या पोळ्या करून नैवेद्य ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे मांडवाच्या ठिकाणी बेळीला बेळमाथणी ठेवण्यात येऊन विधिवत पूजा होते. आजच्या आधुनिक युगात नक्षीदार बेळमाथणीला महत्त्व आहे. यात टोपली, सूप यांचाही समावेश असतो. लग्नघरात नवीन देव आणण्यासाठी नव्या सुपाचा उपयोग होतो. पूर्वी लग्नघरून खापर व बेळमाथणी आणण्यासाठी कुंभाराच्या घरी वाजतगाजत जाऊन खापर आणत. आता धावपळीच्या युगात ही प्रथा मागे पडली.

मातीच्या खापरी अशा आहेत उपयोगी...

मातीमध्ये अनेक जीवनसत्त्व आणि पोषक द्रव्य मिळतात. या उद्देशाने पुरणपोळी बनवितात. मातीच्या चुलीवरची पुरणपोळी व भाकरीही चविष्ट असतात.

पारंपारिक वस्तूंची आजही मागणी
Nashik : एका दिवसात विवाह सोहळ्याची पद्धत सुरू

अशा आहेत लग्नसमारंभास लागणारे वस्तू व दर :

खापर लहान - २०० रुपये

खापर मोठी - ३५० ते ४००

मातीचे चूल - १००

सिमेंट चूल - २००

डिझाईइन बेळमाथण - १५०

बेळ माथण - २००

टोपली - ४०

सूप -१६० ते १८०

केरसुणी - ६० ते ७०

पारंपारिक वस्तूंची आजही मागणी
नवरदेव शेतकरी पुत्राने गाडीवर चढविला बळीराजाचा साज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com