
कसबे सुकेणेची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; जनता कर्फ्यूचा सकारात्मक परिणाम
कसबे सुकेणे (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे गावाची कोरोनामुक्तीकडे (Corona) वाटचाल दिसून येत आहे. ग्रामपंचायत प्रशासन, कोरोना कमिटी, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलिस ठाण्याच्या संयुक्त कामगिरीमुळे दोनदा राबविलेला पाच दिवसांचा जनता कर्फ्यूचाच हा परिणाम आहे. (The positive effect of the Janata curfew)
योग्य नियोजनाने कोरोनाला टक्कर
गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, सद्यःस्थितीला जे बाधित रुग्ण आपल्या घरात किंवा विलगीकरण कक्षात आहेत त्यांचा विलगीकरणाचा (Isolation) १४ दिवसांचा कालावधी लवकरच संपुष्टात येत असून, ते रुग्णदेखील बरे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच कसबे सुकेणेची वाटचाल कोरोनामुक्तीकडे दिसून येत आहे. वेळोवेळी सल्फर हायपोक्लोराइटची (Sulphur hypochlorite) फवारणी व पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने कोरोनाला अटकाव करण्यास ग्रामस्थांना यश आले. यापुढेही शासन नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वैभव पाटील, सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनराज भंडारे, ग्रामसेवक रवी अहिरे, छगन जाधव, रमेश जाधव, बाळू कर्डक, सुहास भार्गवे, अतुल भंडारे, सोमनाथ भागवत, छबू काळे, शिल्पा जाधव, ज्योती भंडारे, मनीषा भंडारे, सविता जाधव, सुरेखा औसरकर, सरला धुळे, आरती कर्डक, छाया गांगुर्डे, अबेदा सय्यद यांनी केले आहे.
हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्यूकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा
हेही वाचा: 'या' महिन्यात मुंबई सुरक्षित असेल आणि शाळाही येतील उघडता
Web Title: The Positive Effect Of The Janata Curfew Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..