नाशिकमध्ये रुग्णालयात उपचाराचे प्रमाण सात टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient
नाशिकमध्ये रुग्णालयात उपचाराचे प्रमाण सात टक्के

नाशिकमध्ये रुग्णालयात उपचाराचे प्रमाण सात टक्के

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोना संसर्गाने गुणाकार पद्धतीने वाटचाल सुरू केली असली तरी यातील एक दिलासादायक बाब महापालिकेच्या अहवालातून समोर येत आहे. ती म्हणजे रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यात ९१ रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून येत असून, अवघे सात टक्के रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे उपचार घेणारे रुग्ण कोमॉर्बिड अर्थात गंभीर आजार असलेले आहेत. त्यामुळे ही बाब कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कमी करणारी ठरत आहे.

हेही वाचा: राज्यनाट्य स्पर्धेने वाढला कलाकारांचा आत्मविश्वास; पाहा व्हिडिओ

पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेने शहरात हाहाकार उडविल्यानंतर आता तिसऱ्या लाटेचे आगमन झाले आहे. दोन अंकी संख्येपर्यंत कोरोना संसर्गाचा दर घसरला. त्यानंतर मात्र गेल्या चार दिवसात गुणाकार पद्धतीने रुग्णांची संख्या आढळून येत आहे. कोरोना संसर्गाचा दर वाढल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सविस्तर अहवालाच्या माध्यमातून किती प्रमाणात रुग्ण वाढत आहे, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण किती आहे, कोमॉर्बिड किंवा गंभीर आजारांच्या रुग्णांचे काय यासंदर्भात अहवाल तयार करताना अवघे सात टक्के कोरोनाबाधित उपचार घेत असल्याची बाब समोर आली आहे. आजमितीला ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४, ०६४ आहे. त्यातील २१५ रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ६७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. १९ रुग्ण हे आयसीयूत उपचार घेत आहे. तर ११ रुग्ण हे व्हेन्टिलेटरवर आहेत. २१ रुग्ण डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात, तर ६२ रुग्ण बिटको रुग्णालयात दाखल आहेत.

हेही वाचा: नाशिक : जात पडताळणीसाठी लाच घेणारा खासगी दलाल एसीबीच्या जाळ्यात

९३ टक्के गृहविलगीकरण

एकूण रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आढळली आहे. दोन टक्के रुग्णांमध्ये किंचित स्वरूपाचा कोरोना फैलाव झाला, असे एकूण ९३ टक्के रुग्ण गृहविलगीकरणार आहे. कोरोना बाधितांमध्ये ९७ टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे.

लसवंत निश्चिंत

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लस न घेतलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे दोन लसीचे डोस घेतलेले तूर्त निश्चिंत दिसतं आहे. परंतु लस घेतली असली तरी सामाजिक अंतर तसेच मास्क वापरणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: The Rate Of Hospital Treatment In Nashik Is Seven Percent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top