esakal | चिमुकल्यांनी पैसे जमवून खरेदी केला एलसीडी....त्यावर सुध्दा दुष्टांची नजर?
sakal

बोलून बातमी शोधा

lcd theft 1.png

शाळेत तिसरीच्या वर्गाच्या पत्रांची दुरुस्ती सुरू होती. पत्रे खोलून बाजूलाच मोकळ्या जागेत ठेवले होते. रविवारी (ता. 12) काम बंद होते. सोमवारी (ता. 13) सकाळी साडेदहाला शाळेत आल्यावर पहिलीच्या वर्गाचा दरवाजा उघडा होता. मुख्याध्यापक राहुल गांगुर्डे व शिक्षिका मनीषा गोरे यांनी खोलीत जाऊन खात्री केली असता सर्वांना धक्काच बसला.

चिमुकल्यांनी पैसे जमवून खरेदी केला एलसीडी....त्यावर सुध्दा दुष्टांची नजर?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक  : पुरणगाव (ता. येवला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गाच्या पत्रांची दुरुस्ती सुरू होती. पत्रे खोलून बाजूलाच मोकळ्या जागेत ठेवले होते. रविवारी (ता. 12) काम बंद होते. सोमवारी (ता. 13) सकाळी साडेदहाला शाळेत आल्यावर पहिलीच्या वर्गाचा दरवाजा उघडा होता. मुख्याध्यापक राहुल गांगुर्डे व शिक्षिका मनीषा गोरे यांनी खोलीत जाऊन खात्री केली असता सर्वांना धक्काच बसला.

असा केला दुष्टांनी प्रकार...

शाळेत तिसरीच्या वर्गाच्या पत्रांची दुरुस्ती सुरू होती. पत्रे खोलून बाजूलाच मोकळ्या जागेत ठेवले होते. रविवारी (ता. 12) काम बंद होते. सोमवारी (ता. 13) सकाळी साडेदहाला शाळेत आल्यावर पहिलीच्या वर्गाचा दरवाजा उघडा होता. मुख्याध्यापक राहुल गांगुर्डे व शिक्षिका मनीषा गोरे यांनी खोलीत जाऊन खात्री केली असता, वर्गाच्या भिंतीवर लावलेला एलसीडी टीव्ही, इलेक्‍ट्रिक बोर्डाची चोरी झाल्याचे लक्षात आले. शाळेच्या पाठीमागे काढून ठेवलेली पत्रेही चोरीस गेल्याचे समजले. झालेल्या घटनेची माहिती पोलिसपाटील गणेश ठोंबरे यांना दिली. त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दहा हजारांचा 32 इंची एलसीडी टीव्ही, पाच हजारांचा इलेक्‍ट्रिक बोर्ड, 15 हजारांचे पत्रे तसेच 30 जुने लोखंडी पत्रेही चोरून चोरट्यांनी नेले. याबाबत मुख्याध्यापक गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

VIDEO : "संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर" - शरद पवार

प्रकार अत्यंत खेदजनक

घडलेला प्रकार अत्यंत खेदजनक असून, घरातील टीव्ही चोरीस गेला असता, तर एवढे वाईट वाटले नसते. कारण हा टीव्ही मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पैशांतून स्मार्ट शिक्षणासाठी घेतलेला होता. - राहुल गांगुर्डे, मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा, पुरणगाव 

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....