Nashik Crime News : घरासमोर बांधलेल्या शेळ्या मेंढ्यांची चोरी

Crime Update
Crime Updateesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात शिर्डी महामार्गलगत असलेल्या काळे वस्तीवर बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरासमोर बांधलेल्या तीन शेळ्या व दोन मेंढ्या वाहनातून चोरून नेल्याची घटना घडली. मेंढपाळास जाग आली असता शिर्डीच्या दिशेला छोटा हत्ती टेम्पो घेऊन चोरट्यांनी पळ काढला. (Theft of goats and sheep tied in front of house Nashik Latest Crime News)

Crime Update
Nashik : अंगावर गरम पाणी सांडल्याने चिमुकलीचा मृत्यु

वावी शिवारात गोडगे पाटील पब्लिक स्कूल समोर शिर्डी महामार्गालगत अशोक किसन काळे यांची वस्ती आहे. श्री. काळे यांचा मेंढी पालनाचा परंपरागत व्यवसाय आहे. घरासमोरच्या पटांगणात बंदिस्त आवारात त्यांनी शेळ्या व मेंढ्या रात्रीच्या वेळेस बांधल्या होत्या. तसेच लहान बकरे व कोकरू घरामध्ये सुरक्षित कोंडले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांना जाग आली असता लोखंडी जाळीच्या कुंपणात असलेल्या शेळ्या व मेंढ्या घोळका करून एका बाजूला शांतपणे उभ्या असल्याचे दिसले. म्हणून ते अंगणात आले असता शिर्डी च्या दिशेने तोंड करून उभा असलेला छोटा हत्ती टेम्पो महामार्गावरून पसार झाला.

अज्ञात चोरट्यांनी संरक्षक कुंपणाच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व सुमारे 80 हजार रुपये किमतीच्या तीन शेळ्या व मेंढ्या घेऊन पसार झाले. वस्तीवरील कुत्र्याला गुंगीचे औषध फवारण्यात आल्याने हा कुत्रा देखील भुंकला नाही. घराच्या बाजूला सकाळपर्यंततो पहूडलेला होता. चोरट्यांनी श्री. काळे यांच्या दुचाकीच्या पेट्रोलची नळी बाजूला काढून सर्व पेट्रोल खाली सोडून दिले होते. श्री. काळे यांनी समोरच राहणाऱ्या दत्ता काळे या भावास आवाज देऊन उठवले. मात्र तोपर्यंत चोरटे टोलनाक्याच्या पुढे वाहनासह पसार झाले होते. याबाबत वावी पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. मात्र पोलिसांचे गस्ती पथक नांदूरशिंगोटे परिसरात असल्याने मदत पोहोचण्यास उशीर झाला.

दोन महिन्यांपूर्वी देखील याच वस्तीवर अज्ञात चोरटे शेळ्या व मेंढ्या चोरण्यासाठी आले होते. वस्तीला खेटूनच साई पालखी मार्ग आहे. या मार्गावर त्यावेळी देखील पिकप जीप उभी करण्यात आली होती. मात्र कुत्र्याच्या भुंकण्यामुळे घरातील सर्वांना जाग आल्याने चोरट्यांचा डाव त्यावेळी उधळला गेला होता. या खेपेला मात्र चोरट्यांनी आपली मोहीम फत्ते केली.

Crime Update
Nashik Crime News : शहरात 2 घरफोड्या; 4 लाखांचा ऐवज चोरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com