Latest Marathi News | अंगावर गरम पाणी सांडल्याने चिमुकलीचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Death

Nashik : अंगावर गरम पाणी सांडल्याने चिमुकलीचा मृत्यु

नाशिक : जुना गंगापूर नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये चिमुकलीच्या अंघोळीसाठी गरम पाणी काढले असता, ते अंगावर सांडल्याने अवघ्या १० महिन्याच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. आवेरा शुभम इंगळे (१० महिने, रा. ओम श्री साई अपार्टमेंट, राठी आमराई, जुना गंगापूर नाका) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. (toddler died after hot water was spilled on his body Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik Crime : अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक; चौघे फरार

सदरील घटना गेल्या शनिवारी (ता. १२) रात्री घडली होती. इंगळे कुटूंबिय राठी आमराईतील ओम श्री अपार्टमेंटमध्ये राहतात. गेल्या शनिवारी (ता. १२) रात्री आवेरा हिच्या अंघोळीसाठी गरम पाणी काढले होते. त्यावेळी बाथरुममध्ये आवेराचा धक्का लागल्याने गरम पाणी तिच्या अंगावर सांडले. यात आवेरा गंभीररित्या भाजल्याने तिला तात्काळ उपचारासाठी वडील शुभम इंगळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसांच्या उपचारानंतरही आवेराची आयुष्याशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. मंगळवारी (ता. १५) रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये पालकांच्या निष्काळजीपणामुळे बालकांचा जीव धोक्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आईस्क्रिम घेण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा विजेचा शॉक लागून तर एका चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याच्या घटना अलिकडेच घडल्या आहेत. यामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: Nashik : जाखोरीत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद!

टॅग्स :Nashikdeathchild news