esakal | पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

water shortage

पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पावसाने मोठी ओढ दिल्याने शहर-जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात तीन हजार ६२२ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा कमी आहे. अजूनही पावसाची दमदार हजेरी नसल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणीकपातीबाबत निर्णय घेण्याचे पत्र दिले आहे. महापालिकेकडून अद्याप प्रतिसाद नसला तरी या आठवडाभरात महापालिकेला पाणीकपातीबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. (there is a possibility of water shortage in Nashik district due to lack of rains)

पावसाने यंदा मोठी ओढ दिली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाण्याचा साठाही कमी आहे. हे चित्र असेच सुरू राहिले तर सिंचन उद्योग दूर आधी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील धरणसमूहापैकी गंगापूर व दारणा धरणसमूहातील पाण्याच्या साठ्यावर थेट पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत असते. त्यात, समन्यायी पाणीवाटपानुसार उन्हाळ्यात गोदावरीच्या धरणातील पाणी मिळविण्यासाठी मराठवाड्यातील आक्रोश वाढतो. राजकारण पेटायला लागते. त्या दिशेने सध्या जिल्ह्यातील पावसाचे वातावरण चालले आहे.

जलसंपदाचे पत्र

जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणीकपातीचा विचार करण्याचे पत्र दिले आहे. महापालिकेने अद्याप पाणीकपातीचा निर्णय घेतलेला नाही. १५ ऑगस्टचा साठा विचारात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र पावसाची ओढ अशीच सुरू राहिली, तर आठवडाभरातच महापालिकेला पाणीकपातीबाबत विचार करावा लागणार आहे. पाणीकपातीचा निर्णय घेण्यास जास्त विलंब केल्यास, पाणीटंचाईची जबाबदारी कुणावर ठेवायची? याचा विचार करावा लागणार आहे. गेल्या वर्षी जुलैपर्यत १७ टक्के पाउस झाला होता. यंदा मात्र जेमतेम ३.४५ टक्के पाऊस झाला आहे. सध्याही पावसाची ओढ आहे. त्यामुळे खरीप पेरण्यावरही पावसाच्या ओढीचा परिणाम झाला आहे. त्यानंतरही पावसाची शक्यता दिसत नाही.

हेही वाचा: मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…

धरणसमूह यंदाचा साठा टक्के मागील वर्षी टक्के कमी (टक्के)

गंगापूर धरणसमूह २५३२ दलघफू २५ ३५४९ दलघफू ३५ १० टक्के

दारणा धरणसमूह ६८५७ दलघफू ३६ ३८६९ दलघफू ३६ ०० टक्के

पालखेड समूह १३२६ दलघफू १६ ६१० दलघफू ०७ ०९ टक्के

गिरणा धरणसमूह ८३०१ दलघफू ३६ ६९७८ दलघफू ३० ०६ टक्के

एकूण धरणसाठा २१४२९ दलघफू ३३ १७८०७ दलघफू २७ ०६ टक्के

दोन वर्षांतील तुलनात्मक पाऊस (जुलै पहिला आठवडा)

तालुका आतापर्यतचा पाउस- टक्के गेल्या वर्षी (मि.मी) टक्के

नाशिक १० मि.मी. ४.५ ८२. मिमी. ११.००

इगतपुरी ६५ मि.मी ५.७ ७४० मि.मी २४.२०

दिंडोरी ३.० मि.मी १.४ ७४ मि.मी १०.९०

पेठ ७.१ मि.मी १.० ३४९ मि.मी १७.३

त्र्यंबकेश्वर १७.० मि.मी १.९ २५७ मि.मी ११.८६

मालेगाव ०००००० ०० १३९ मि.मी ३०.३८

नांदगाव ५२. मि.मी ४३.९ ९९ मि.मी २०.१५

चांदवड ०००० ०० ७३.०मि.मी १३.७९

कळवण १.० मि.मी ०.६ ६३ मि.मी ९.८५

बागलाण ०० मि.मी ०.० ११३ मि.मी २३.१५

सुरगाणा ३.१ मि.मी १३.६ ३७३ मि.मी १९.७४

देवळा ४.०मि.मी ४.१ ५०.९ मि.मी १२.०४

निफाड २.५ मि.मी २.४ १५२.३ मि.मी ३२.९४

सिन्नर ०० ०० ७३ मि.मी १३.९७

येवला ०० ०० ४२ मि.मी ९.२६

(there is a possibility of water shortage in Nashik district due to lack of rains)

हेही वाचा: पक्षांतर्गत डागडुजीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात

loading image