esakal | ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रोजच कसरत; मालेगावात रुग्णांचे जीव टांगणीला

बोलून बातमी शोधा

Malegaon Hospital
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रोजच कसरत; मालेगावात रुग्णांचे जीव टांगणीला
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कसमादेसह चांदवड, नांदगाव परिसरातील कोरोनाबाधितांसाठी मालेगाव मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरातील सामान्य रुग्णालय व महापालिकेच्या सहारा रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी प्रत्येकी १०० बेडची सोय आहे. सर्व बेड फुल आहेत. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या दोन्ही रुग्णालयांना नियमित व वेळेवर ऑक्सिजनपुरवठ्यासाठी रोजच कसरत करावी लागते. यामुळे आरोग्य यंत्रणेसह अडीचशे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला असतो. स्थानिक प्रशासनाला पुरवठा विस्कळित झाला, तर काय ही चिंता सतत भेडसावते.

२० केएल ऑक्सिजन टँकची प्रतीक्षा

शहरातील रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी सामान्य रुग्णालयास २० केएल ऑक्सिजन टँक मंजूर असून, या टॅंकचीच प्रतीक्षा आहे. महापालिकेला कार्डियाक रुग्णवाहिकेची आवश्‍यकता आहे. सहारा रुग्णालय वर्दळीच्या ठिकाणी असून, या रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले नाही. रुग्णालयात दुर्घटना घडल्यास गंभीर स्थिती ओढावेल. सध्या एकच मुख्य दरवाजा कार्यान्वित असून आत-बाहेर जाण्यासाठी दुसरा दरवाजा सुरू करतानाच पर्यायी व्यवस्थेची गरज आहे. जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कालच्या दुर्घटनेनंतर कोलमडून पडली. शहरात तर आपत्ती व्यवस्थापन कागदोपत्रीच आहे. ऑक्सिजन पूर्ततेसाठी ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. ‘सहारा’ला तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक कुशल कर्मचाऱ्यांची उणीव व नियोजनाचा अभाव आहे.

हेही वाचा: तर मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राजीनामा द्यावा! भाजपचा शिवसेनेवर पलटवारसामान्य रुग्णालयात ११ ड्युरा सिलिंडर, २४० जम्बो व ५० लहान ऑक्सिजन सिलिंडर आहेत. रुग्णालयात ११० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रोज ३५० ऑक्सिजन सिलिंडरची गरज असते. रोजची गरज भागते, मात्र नवीन सिलिंडर येईपर्यंत मोठी कसरत करावी लागते. पुरवठादार लिक्विड ऑक्सिजन नाही. सिलिंडर देता येणार नाही असे सांगून झोप उडवितो. कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अन्न औषध प्रशासन यांसह संबंधित यंत्रणेला रोज दूरध्वनी करावे लागतात. त्यांच्या प्रयत्नानंतर ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होतात. रोजची ही कसरत थांबावी. धुळे येथील पुरवठा शहरासाठी सोयीस्कर आहे.
- डॉ. किशोर डांगे, वैद्यकीय अधीक्षक, सामान्य रुग्णालय, मालेगाव

महापालिकेकडे ५०० ऑक्सिजन सिलिंडर आहेत. गोळ्या, औषधांचा मुबलक साठा आहे. मायलॉन कंपनीला पाच हजार रेमडेसिव्हिरची ऑर्डर दिली आहे. टप्प्याटप्प्याने इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. सहारासह कोविड केंद्र असलेल्या दिलावर हॉल, हज हाउस व एमएसजीला फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व सोयी-सुविधांयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका घेण्याचे नियोजन आहे. तज्ज्ञ डॉक्टर पूर्ततेसाठी नियोजन सुरू आहे.
- नितीन कापडणीस, उपायुक्त, मालेगाव महापालिका

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..