गोदावरी अन्‌ ब्रह्मगिरीबद्दल तडजोड नाही - जिल्हाधिकारी

Suraj Mandhare,  Rajendra Singh
Suraj Mandhare, Rajendra Singh

नाशिक : गोदावरीचा उगम म्हणून ब्रह्मगिरीला वाचवायला हवे, अशी पर्यावरण रक्षणाविषयीची भूमिका आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी स्पष्ट केली. त्याचक्षणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गोदावरी आणि ब्रह्मगिरीबद्दल कसलीही तडजोड होणार नाही, असे स्पष्ट केले. निमित्त होते, गोदावरी गीत लोकार्पण कार्यक्रमानिमित्त इस्पॅलिअर इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे. (there will be no compromise on Godavari and Brahmagiri Collector mandhare clarified)

पर्यावरण आणि विकासाचा समतोल राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची माहिती देऊन मांढरे म्हणाले, की टास्क फोर्समध्ये पर्यावरण प्रेमी, अधिकारी, बांधकाम आणि क्रशर व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकबद्दल मला काळजी असल्याने पर्यावरणीय, नैसर्गिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक महत्व नसलेल्या ठिकाणी काम करायला हरकत असण्याचे कारण नाही. त्यासाठी तीनस्तराचा विचार होईल. पहिला भाग म्हणजे, कोणी कशालाही हात लावू शकणार नाही. दुसरा भाग म्हणजे, नियंत्रण ठेवणे आणि तिसरा भाग म्हणजे, हानी न होणाऱ्या ठिकाणी विकासकांना मान्यता द्यावी लागेल. प्रत्येक जण बंद म्हणत राहिल्या, पर्याय द्यावा लागेल. भविष्याला धक्का लागणार नाही अशा ठिकाणी काम करायला हरकत घेण्याचे कारण नाही.

ब्रह्मगिरीच्या उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर बैठकीला महत्व प्राप्त झाले होते. गोपाळ पाटील, लक्ष्मण सावजी, सत्यनाराण बोलीशेट्टी, विनोद बोधनकर, नरेंद्र चूब, सचिन जोशी, चैतन्य उदगीरकर, किरण भालेराव आदी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमींच्या ब्रह्मगिरीबद्दल भावना तीव्र आहेत, ही बाब निदर्शनास आणून देत डॉ. सिंह यांनी नाशिकची ओळख असलेल्या बाबींबद्दल आदर करणे, सांभाळून ठेवणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. त्याबद्दल ब्रह्मगिरीच्या नुकसानीबद्दल प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या दंडाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

(there will be no compromise on Godavari and Brahmagiri Collector mandhare clarified)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com