विंचूरला पोलिसाच्याच घरी चोरी | Latest Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief

विंचूरला पोलिसाच्याच घरी चोरी

विंचूर (नाशिक) : विंचूर येथे पोलिसाच्या घरी सोमवारी (ता. ६) मध्यरात्री चोरट्यांनी तीन लाख ६५ हजारांचे सोने चोरी केली असून, या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

येथील पोलिस दीपक तुळशीराम निकाळे नाशिक मुख्यालयात कामावर होते. त्यांच्या पत्नी गावी गेल्या असल्याने त्यांचा मुलगा घरी एकटाच होता. मुलगा खालच्या खोलीला कुलूप लावून वरच्या खोलीत झोपलेला असताना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

हेही वाचा: मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हातगाड्या बनल्या गुन्हेगारीचा अड्डा

कपाटाचा दरवाजा लोखंडी सळईच्या सहाय्याने वाकवून कपाटातील अंदाजे तीन लाख ६५ हजार किमतीचे १४ तोळे सोने घेऊन फरारी झाले. सकाळी निकाळे यांचा मुलगा झोपेतून उठल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, हवालदार योगेश शिंदे, कैलास मानकर यांनी चोरीची माहिती घेऊन पंचनामा केला. त्यानंतर ठसेतज्ज्ञांना बोलविण्यात आले. लासलगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा: 5 महिन्यांपूर्वी गुन्हे करून पळून गेलेल्या आरोपीस अटक

Web Title: Thief 3 Lakh 65 Thousand Gold Stolen From Police House In Vinchur In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikpolicecrimethief
go to top