SAKAL Impact : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था

NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : शहरातील रस्त्यांसह महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या कामांची गुणवत्ता नियंत्रण व तपासण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर स्वतंत्र तज्ञ कार्यकारी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भात सर्व विभागप्रमुखांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. (Third party organization for quality control in NMC on lines of Mumbai Municipal Corporation Nashik Latest Marathi News)

यंदाच्या पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत असून, महापालिकेच्या कामकाजाबद्दल नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या खड्ड्यांमुळे अनेक राजकारणी तापत्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करताना त्यांच्याच कार्यकाळात किंवा त्यांच्याच पक्षाकडून कामांना मंजुरी दिली जाते हेदेखील विसरतात.

महापालिकेला कायम टीकेचे धनी व्हावे लागत असल्याने विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर गुणवत्ता नियंत्रणासाठी व तपासणीसाठी स्वतंत्र तज्ञ कार्यकारी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्वच कामांची होणार तपासणी

महापालिकेच्या सर्वच विभागांमार्फत झालेल्या कामांची सीओईपी किंवा आयआयटीकडून दर्जाबाबत तपासणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहे. ‘सकाळ’ने या संदर्भात मागील आठवड्यात गुणवत्ता व नियंत्रण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणला होता.

NMC News
Nashik : ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास; 40 जणांना लागण झाल्याने भीतीचे वातावरण

या विभागाकडून योग्य पद्धतीने कामाची तपासणी झाल्यास चुकीच्या कामांना वेळेवर अटकाव करता येणे शक्य आहे. मात्र, याच विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गुणवत्तेचे अपरिपक्वतेचे दर्शन घडविले जात असल्याच्या भूमिकेवर मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. आयुक्तांनी सर्वच कामांची आयआयटीमार्फत तपासणी करण्याचा निर्णय दिला आहे.

कंत्राटदार काळ्या यादीत

महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच विभाग अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर एक महिन्याच्या आत रस्ते पूर्ववत झाले पाहिजे. तसेच, देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपला नसेल अशा कंत्राटदारांकडून रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करून घ्यावे. अन्यथा अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

NMC News
Diwali Festival: यंदा आतषबाजीला महागाईची झळ!; फटाक्यांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com