Latest Marathi News | ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास; 40 जणांना लागण झाल्याने भीतीचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Hiraman Khoskar sending serious patients to the district hospital.

Nashik : ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास; 40 जणांना लागण झाल्याने भीतीचे वातावरण

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्यातील तारंगण पाडा येथील ४० पेक्षा अधिक ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याने रविवारी (ता. १६) तालुक्यातील विविध रुग्णालयांत रुग्णांना दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातही काही रुग्णांना दाखल करण्यात आले असून, काही रुग्णांना घोटी आणि नाशिक येथील खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. (40 Villagers infected suffering from diarrhea vomiting at taranganpada Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: SAKAL- NIE : कल्‍पकतेतून साकारले रंगबिरंगी आकाशकंदील!

या गंभीर घटनेची माहिती समजताच आमदार हिरामण खोसकर यांनी तातडीने भेट देऊन तेथे घडलेल नेमका प्रकार जाणून घेतल्यानंतर दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचे जाणवले. आमदार खोसकरांनी तातडीने आरोग्य विभाग, तहसील प्रशासन, वैद्यकीय अधिकारी यांच्या टीमला घटनास्थळी पाचारण करून उपाययोजना सुरू केल्या.

तारांगण पाड्यातील उर्वरित ग्रामस्थांना वैद्यकीय सुविधा त्वरीत उपलब्ध करून दिल्या. तसेच दूषित पाणी नष्ट करून टँकरने पाणी आणून येथे चांगला पाणीपुरवठा सुरू केला. या ठिकाणी वैद्यकीय पथक सर्व नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले असून, गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. तारांगण पाड्यात आता वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तळ ठोकून असून सध्या येथील नागरिकांची परिस्थिती सुधारत असून घाबरण्यासारखे काही नसून मी रात्रभर या घटनेकडे गांभीर्याने लक्ष ठेवून असणार आहे, अशी माहिती आमदार खोसकर यांनी दिली.

हेही वाचा: Nashik : नागपूर- मुंबई दरम्यान दिवाळीनिमित्त विशेष गाड्या

टॅग्स :NashikDisease