esakal | गेल्या वर्षी एकही नाही; यंदा बनविल्या बाप्पाच्या हजारो मुर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati Idol

गेल्या वर्षी एकही नाही; यंदा बनविल्या बाप्पाच्या हजारो मुर्ती

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याअनुषगांने राजस्थानी मूर्तिकारांनी मेडिकल फाटा आडगावजवळील महामार्गालगत तात्पुरत्या स्वरूपात छोटे कारखाने थाटले असून, दीडशेहून अधिक राजस्थानी मूर्तिकार रोज हजारो गणेशमूर्तींना अंतिम रूप देत आहे. कोरोना (Corona) निर्बंधामुळे चार फुटाच्या मूर्तींना परवानगी असल्यामुळे गणेशमूर्तींसाठी छोट्या मूर्तींना पसंती मिळत आहे. यंदा मागणी वाढेल, या आशेने राजस्थानी मूर्तिकार हजारो मूर्ती बनवित आहे.

यंदा मागणी चांगली

मोठे उदयपूर राजस्थान येथून महिनाभरापासून मूर्तिकार नाशिकमध्ये मूर्ती बनविण्याचे काम करत आहे. राजस्थानी मूर्तिकार सहा इंचापासून ते तीन फुटापर्यंत मूर्ती तयार करत असून, १०० रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत मूर्ती राजस्थानी मूर्तिकार तयार करत आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी एकही मूर्ती या राजस्थानी मूर्तिकारांनी तयार केली नव्हती. यंदा नाशिकमध्ये गणेशमूर्तींचा व्यवसाय होईल, या आशेने मूर्तिकार आले आहे. महिनाभरात जवळपास तीन हजार मूर्ती बनविल्या आहेत. यात, मात्र मोठ्या मूर्तींना मागणी कमी असल्यामुळे तीन फुटाच्या पन्नासहून कमी मूर्ती तयार केल्या असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. राजस्थानी मूर्तिकार साहित्य नाशिकच्या बाजारपेठेतूनच घेत असून, यंदा चांगली मागणी असल्याचे सांगितले.

हेही वाचा: PHOTO : लाडक्या बाप्पाच्या मुर्तींनी सजली बाजारपेठ!

घरगुती मूर्ती बनविण्यावर भर

गणेश मंडळाच्या भव्यदिव्य मूर्ती बसविण्यासाठी कोरोना निर्बंधामुळे बंदी असल्यामुळे राजस्थानी मूर्तीकारांनी घरगुती बाप्पाची मूर्ती बनविण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. महामार्गालगत तात्पुरत्या कारखान्यात महिनाभरात जवळपास चार हजाराहून अधिक मूर्ती बनविण्यात आल्या असून, बनविण्याचे काम सुरूच असल्याचे चित्र आहे.

''मूर्तींचा व्यवसायासाठी नाशिकमध्ये राजस्थानी मूर्तिकार आले असून शाडू माती मिश्रित पीओपीने मूर्ती बनविण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी मुर्ती बनविता आल्या नाही, यावर्षी मूर्तींची मागणी वाढेल अशी आशा आहे.'' - तुळशीराम राठोड, मूर्तिकार

''नाशिकमध्ये आल्यापासून महिनाभरात दोन हजार मूर्ती बनविल्या. घरगुती मूर्तींना चांगली मागणी आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे राजस्थान उदयपूरमध्येच होतो. २०१९ मध्ये पुण्यात मूर्ती बनविल्या होत्या. राजस्थानी मूर्तिकार फिरस्ती करत असल्यामुळे यंदा नाशिकमध्ये मूर्ती बनविण्याचे काम करत आहोत.'' - रमेश राठोड, मूर्तिकार

हेही वाचा: ग्रामीण भागात हक्काच्या घरासाठी नागरीकांना प्रोत्साहित करा : गमे

loading image
go to top