MSRTC News : STच्या तिजोरीत देवीने टाकले साडेतीन कोटी

Saptashrungi Devi MSRTC News
Saptashrungi Devi MSRTC Newsesakal

नाशिक : नवरात्रोत्‍सवात सप्तशृंगी देवीच्‍या गडावर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आलेल्‍या भाविकांनी एसटीने प्रवास केल्‍याने यात्रोत्‍सव कालावधीत महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाला भरघोस उत्‍पन्न मिळाले आहे. नवरात्रोत्‍सवादरम्‍यान २ कोटी ५३ लाख २८ हजार ४७३ रुपयांचे उत्‍पन्न मिळाले. कोजागरी पौर्णिमेला ८२ लाख १५ हजार १३७ रुपयांचे उत्‍पन्न मिळाले आहे. अशी महामंडळाच्‍या तिजोरीत ३ कोटी ३५ लाख ४३ हजार ६१० रुपयांची भर पडली आहे. (three half crore in profit of MSRTC from saptashrungi devi vani gad during navratri 2022 nashik Latest Marathi News)

भाविकांच्‍या सुविधेसाठी महामंडळातर्फे सप्तशृंगी गडाकरीता जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या होत्‍या. जिल्‍हाभरातील विविध भागांतून या जादा बसगाड्या सोडण्यात आल्‍या होत्‍या. तसेच गडाच्‍या पायथ्यापासून घाटाचा मार्ग खासगी वाहतुकीसाठी नवरात्रोत्‍सव कालावधीत बंद ठेवण्यात आला होता. त्‍यामुळे खासगी वाहनाने येणाऱ्या भाविकांसाठी पायथ्यापासून बसगाड्या उपलब्‍ध केलेल्‍या होत्‍या. या बसगाड्यांना भाविकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून, एसटी महामंडळाच्‍या तिजोरीतही मोठा महसूल जमा झालेला आहे.

नवरात्रोत्‍सवाच्‍या नऊ दिवसांप्रमाणे कोजागरी पौर्णिमेलादेखील देवीच्‍या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली होती. एकंदरीत भाविकांकडून मिळालेल्‍या प्रतिसादामुळे एसटी महामंडळाला भरघोस उत्‍पन्न मिळाले आहे. भाविकांच्‍या सुविधेसाठी जादा बसगाड्या उपलब्‍ध करून देताना, महामंडळातर्फे पायथ्याजवळ तसेच गडावर नियंत्रण कक्ष कार्यान्‍वित करण्यात आले होते.

Saptashrungi Devi MSRTC News
Smart City Companyकडून पुन्हा एकदा 2 Cycle track बनवण्याचा निर्णय

आकडे बोलतात...

नवरात्रोत्‍सवातील स्‍थिती..

बसफेऱ्या-------------------------१८ हजार ७२१
प्रवासी संख्या--------------७ लाख ८२ हजार ५९२
उत्‍पन्न------------२ कोटी ५३ लाख २८ हजार ४७३

कोजागरी पौर्णिमेची स्‍थिती..

बसफेऱ्या-------------------५ हजार २५०
प्रवासी संख्या------२ लाख २९ हजार ६९३
उत्‍पन्न-----------८२ लाख १५ हजार १३७

Saptashrungi Devi MSRTC News
Nashik : द्राक्षाच्या गोड शिवारात, तिखट मिरचीचा तडका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com