Trading Fraud: पूजा भोईरच्या ‘डीमॅट’मध्ये सव्वा तीन कोटी! शेअर्स ट्रेडिंग फसवणूकप्रकरणी 4 दिवसांची कोठडी

Pooja Bhoir
Pooja Bhoiresakal
Updated on

Trading Fraud : सोशल मीडियावर ‘रिल्स’ आणि मराठी मालिकांमधील प्रसिद्ध बाल कलाकार साईशा भोईर हिची आई पूजा विशांत भोईर हिला नाशिक आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली आहे.

शेअर बाजारातील आर्थिक गुंतवणूकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून तिने शहरातील अनेकांना सुमारे ३ कोटींचा गंडा घातला आहे. मुंबई, ठाण्यातही तिच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, नाशिक पोलिसांनी तिला ठाणे पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.

तिच्या डीमॅट अकांऊटमध्ये ३ कोटी ३० लाख रुपये असल्याची माहिती तपासात समोर आली असून, आलिशान फ्लॅट, सोने आदी मालमत्तेची माहिती नाशिक शहर गुन्हेशाखेच्या तपासातून समोर आली आहे. (Three half crores in Pooja Bhoirs Demat account 4 days custody in share trading fraud case nashik news)

अतुल सोहनलाल शर्मा (वय ६६, रा. सिरीन मिडोज, गंगापूर रोड) यांनी तीन कोटी रुपयांच्या फसवणुकप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गेल्या एप्रिल अखेरीस पूजा विशांत भोईर (वय ३२), विशांत विश्‍वास भोईर (वय ३५, रा. कल्याण, ठाणे) यांच्याविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित पूजाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती, तर तिचा पती विशांत फरारी आहे. ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये आर्थिक गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तिने अनेकांना गंडा घातला आहे. मुंबईतील फसवणूकप्रकरणी पूजाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, नाशिक पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेतील उपनिरीक्षक रुपेश केदार यांचे पथक करीत आहे. या तपासात पूजाच्या बँक खात्यांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pooja Bhoir
Nashik Bribe Case: लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित; सतिश खरे, धनगर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

तसेच, पूजाने अनेकांना फसविल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत असून, यात नाशिकसह मुंबईतील हायप्रोफाईल नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, पूजाने परताव्यासाठी दिलेले धनादेशही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने पूजा भोईर हिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

"पूजा भोईरच्या मालेमत्ता जप्तीची कारवाई सुरु आहे. तिच्या डीमॅट खात्यावर तीन कोटी ३० लाख रुपये आढळून आले. तिच्याकडे २७ लाख सोने व आलिशान फ्लॅट आहे. तिच्याशी संबंधित मालमत्तांचा शोध सुरु असून, त्या लवकरच जप्त केल्या जातील. याबाबत तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी देण्यासाठी पुढे यावे."

-प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा

Pooja Bhoir
Jalana Crime : डुकरे नेण्यावरून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com