Nashik Accident Update : मृतांच्या मदतीसाठी महिन्यात तीन प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik Accident Update : मृतांच्या मदतीसाठी महिन्यात तीन प्रस्ताव

नाशिक : दोन मोठे अपघात आणि एक आग अशा तीन मोठ्या दुर्घटनेमुळे जिल्हा प्रशासनाला साधारण महिनाभरात तीनदा शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवावे लागले. औरंगाबाद महामार्गावरील डिसेंबर महिन्यातील ट्रॅव्हल बस जळाली. त्यात १३ जणांचे मृत्यू झाले.

जिंदाल (ता. इगतपुरी) येथील आगीत तिघांचे मृत्यू झाले. काल (ता.१३) सिन्नर तालुक्यात शिर्डी मार्गावर झालेल्या अपघातात १० प्रवाशांचे मृत्यू झाले. साधारण महिन्याभरातील या तिन्ही घटनांमुळे २६ हून अधिक मृत्यू झाले आहे.

तिन्ही घटनांत शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविले गेले आहेत. (Three offerings in a month to help the dead proposed Two accidents third fire incident in Nashik district Nashik News)

हेही वाचा: Nashik News : होळकर पुलावरील पादचारी मार्गाला भेगा

केंद्राकडून मदत

नाशिक- औरंगाबाद मार्गावर संत जनार्दन चौकालगत झालेल्या बस जळाल्याच्या घटनेत १३ प्रवासी जळाले. त्यात केंद्राकडून ५ लाख तर राज्य शासनाकडून २ लाख याप्रमाणे सात लाखांची मदत जाहीर झाली तसेच मृताच्या नातेवाइकांचा शोध घेउन त्यांच्या खात्यात मदत जमा झाली. महिनाभरात त्यासाठी प्रस्ताव पाठविला गेला.

पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील प्राधिकरणाकडे मृताच्या माहितीशिवाय आधार, पंचनाम्यासह इतर बहुतांश माहिती अपलोड करावी लागते. त्यानंतर वारसांबाबत शहानिशा करून त्यांचे हक्क निर्धारित झाल्यानंतर मदत दिली जाते. यात नातेवाईकातील हक्क हिस्से यावरुन वाद असल्यास त्याचा मदत विलंबाने मिळण्यावर परिणाम होतो.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Jalgaon News : पहूरच्या घरफोडीतील टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

इगतपुरी तालुक्यातील जिंदाल कंपनीच्या आगीच्या घटनेचा प्रकार चर्चेत राहिला यात, तिघं जणांचे मृत्यू झाले. मात्र संबंधित दुर्घटनेत केंद्र शासनाकडून मदत जाहीर झालेली नाही. केवळ राज्य शासनाकडूनच मदत दिली जाणार आहे. त्यासाठी तीन मृतांच्या मदतीसह जखमीच्या मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा यंत्रणेकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. जिंदाल दुर्घटनेची चौकशी सुरु असतांनाच, सिन्नर तालुक्यातील शिर्डी रस्त्यावरील अपघाताचे प्रकरण उघडकीस आले.

केंद्राची मदत

सिन्नरच्या अपघातात दहा जणांचे मृत्यू झालेले असल्याने यात केंद्र शासनाच्या आपत्ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाकडून पाच लाखांची मदत अपेक्षित आहे. त्यासाठी अपघातातील मृतांच्या वारसांचा शोध सुरु झाला आहे. त्यांचे मोबाईल क्रमांक वारस असल्याची खात्री, पंचनामे, पुरावे, आधार क्रमांक, बँकांचे खाते क्रमांकासह राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार छाननी सुरु आहे. त्यानुसार दोन चार दिवसांत माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करीत मदत मागितली जाणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या दुर्घटनेबाबत महिनाभरात तीनदा मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

हेही वाचा: Nashik News : NMC क्षेत्रातील आस्थापनांच्या मराठी फलकसंदर्भात आवाहन!