Nashik Bus Fire Accident : मुंबई आग्रा महामार्गावर राहुड घाटात बर्निंग बसचा थरार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire accident

Nashik Bus Fire Accident : मुंबई आग्रा महामार्गावर राहुड घाटात बर्निंग बसचा थरार!

चांदवड (जि. नाशिक) : शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. चालक वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील पस्तीस प्रवाशी सुखरूप आहेत.

या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करीत बसला कवेत घेतले. यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.

यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. (thrill of burning bus in Rahud Ghat on Mumbai Agra highway Nashik bus Fire Accident news)

हेही वाचा: Nashik Crime News : कालभैरवनाथ महाराज मंदिरातून दानपेटी चोरीस

शहादा कडून नाशिक जाणाऱ्या बस क्रमांक MH 20 CL 4128 हिने राहुड घाटात अचानक पेट घेतला, बसने पेट घेतल्यामुळे बसमधील प्रवाशांची तुंबळ उडाली प्रवाशी जास्त आग लागण्याच्या आत सुखरूप बस मधून बाहेर आले, यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी या अपघातात झाली नाही.

चांदवड टोल नाका व मालेगाव येथील अग्निशामक वाहने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगी वरती नियंत्रण मिळवले, या आगीमध्ये बसची केबिन पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. यावेळी काही काळ मुंबई आग्रा महामार्गावर दोन्ही बाजुची वाहतूक थांबण्यात आली होती. घटनास्थळी चांदवड पोलीस व सोमा टोलचे कर्मचार्यांनी अपघातग्रस्तांना मदत करत ट्राफिक सुरळीत केली.

हेही वाचा: Jalgaon Crime News : पिंप्राळ्यात तरुणाची घरात आत्महत्या