Hindu Jan Akrosh Morcha : जनआक्रोश मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त

लव जिहाद कायद्याची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी रविवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
Hindu Jan Akrosh Morcha
Hindu Jan Akrosh Morcha esakal

Hindu Jan Akrosh Morcha : वक्फ कायदा रद्द करून लव जिहाद कायद्याची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी रविवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. (Tight police deployment for public protest march in Hindu Jan Akrosh nashik news )

दरम्यान, याच दिवशी मुस्लिम जनआक्रोश मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. परंतु पोलिसांनी सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी मध्यस्थी करीत मुस्लिम जनआक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे.

सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व कर्मचाऱ्याचा कडेकोट पोलिस बंदोबस्त असेल. तसेच, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, राखीव दलाची तुकडीही बंदोबस्तात तैनात असणार आहे.

Hindu Jan Akrosh Morcha
Hindu Jan Aakrosh Morcha : सुप्रिया सुळे मोर्चाबाबत असं का म्हणाल्या?

मुस्लिम जनआक्रोश मोर्चा १६ फेब्रुवारीला

रविवारीच अल्पसंख्याक काँग्रेसतर्फे ‘वक्फ कायदा १९९५चे संरक्षण समर्थनार्थ व शहरात मुस्लिम तरुणांवर झालेल्या पक्षपाती कारवाईच्या निषेधार्थ ‘मुस्लिम जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार होता. त्यासाठीची परवानगीही पोलिसांकडे मागण्यात आली होती. दोन्ही मोर्चे शहरातून निघाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.

त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात मध्यस्थीची भूमिका घेत आवाहन केले असता, त्यास अल्पसंख्याक काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुस्लिम जनआक्रोश मोर्चा आता रविवारी ऐवजी शुक्रवारी (ता. १६) काढण्यात येणार असल्याचे अल्पसंख्याक काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष हनिफ बशीर शेख यांनी स्पष्ट केले आहे.

''हिंदू जनआक्रोश मोर्चाला अटी-शर्तीच्या अधीन पोलिस परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच, पोलिसांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुस्लिम जनआक्रोश मोर्चा येत्या शुक्रवारी काढण्यात येणार आहे.''- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

Hindu Jan Akrosh Morcha
Hindu Jan Akrosh Morcha : वक्फ बोर्डाच्या विरोधात उद्या जनआक्रोश मोर्चा

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com